नवी दिल्ली : गृह मंत्रालयानं कॉंग्रेसच्या अडचणी वाढवल्या आहेत. राजीव गांधी फाउंडेशननं परदेशातून देणग्या घेताना कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप असून, या प्रकरणाचा केंद्र सरकार तपास करणार आहे. केंद्र सरकारनं प्रकरणाच्या चौकशीसाठी आंतर मंत्रालयीन समिती गठित केली आहे.
ईडीचे संचालक (सक्त वसुली संचालनालय) या समितीचे प्रमुख असणार आहेत. पीटीआयनं यासंबंधीचं वृत्त दिलं आहे. गृह मंत्रालयाने यासाठी एक इंटर मिनिस्ट्रीयल कमिटीचीही नेमणूक केली असून ही कमिटी समन्वयकाची भूमिका बजावणार आहे.
या प्रकरणी राजीव गांधी फाऊंडेशन, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट या तीन फाऊंडेशनची ईडीकडून चौकशी होईल. प्रिव्हेन्श ऑफ मनी लाँड्रिग अॅक्ट आणि इन्कम टॅक्सच्या नियमांचा भंग केल्याचा आरोप या फाऊंडेशनवर लावण्यात आला आहे.
MHA sets up inter-ministerial committee to coordinate investigations into violation of various legal provisions of PMLA, Income Tax Act, FCRA etc by Rajiv Gandhi Foundation, Rajiv Gandhi Charitable Trust & Indira Gandhi Memorial Trust.
Spl. Dir of ED will head the committee.
— Spokesperson, Ministry of Home Affairs (@PIBHomeAffairs) July 8, 2020
गांधी कुटुंबीयांशी संलग्न असणाऱ्या या दोन्ही ट्रस्टने नियमांचे उल्लंघन तर केले नाही ना? याचा तपास करण्यात येणार आहे. भाजपाकडून काही दिवसांपूर्वी राजीव गांधी फाऊंडेशनला चीनी दुतावासाकडून आर्थिक मदत म्हणजे डोनेशन मिळाल्याचा आरोप करण्यात आला होता. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार तीन ट्रस्टची चौकशी होणार आहे.
काही दिवसांपूर्वी वर्च्युअल रॅली दरम्यान भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी कॉंग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि कॉंग्रेसवर आरोपही केले होती. नड्डा त्यावेळी म्हणाले होते की,’मला आश्चर्य वाटले की 2005-06मध्ये राजीव गांधी फाउंडेशनला चीनी दूतावास आणि चीनकडून देणगी म्हणून 2 लाख डॉलर मिळाले. हे कॉंग्रेस आणि चीनमधील एक गुप्त संबंध आहे.
बाळासाहेब ठाकरेंच्या काळातल्या ‘सामना’ची आज काय अवस्था झाली, फडणवीसांचे जोरदार प्रत्युत्तर
सारथी संदर्भात उद्या अजित पवारंनी मला चर्चेसाठी निमंत्रण दिलंय – खा. संभाजीराजे
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य आणि विचारला कुणीही धक्का लावू शकत नाही – अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

