मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकांना अद्यापही बराच अवधी आहे. मात्र, राजकीय पक्षांमध्ये आता पासूनच आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी सुरु आहेत. २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. दरम्यान, आता राज्यातील महाविकास आघाडीमध्ये असलेल्या सहकारी काँग्रेस पक्षानेच शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेत ८०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे.
यासोबतच, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघात मालमत्ता कर वसुलीत 100 कोटींची तफावत असून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी देखील काँग्रेस नेते आणि मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली आहे.
आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात मालमत्ता कर वसुलीत १०० कोटींची तफावत असल्याचा काँग्रेसने
'घरचा आहेर' दिला असल्यामुळे तर पर्यावरण मंत्र्यांना कोविडची लागण झाली नाही ना? pic.twitter.com/dMHY5Fj8Ts— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 24, 2021
काँग्रेसनेच शिवसेनेवर हे आरोप केल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. तर, भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. ‘आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात मालमत्ता कर वसुलीत १०० कोटींची तफावत असल्याचा काँग्रेसने ‘घरचा आहेर’ दिला असल्यामुळे तर पर्यावरण मंत्र्यांना कोविडची लागण झाली नाही ना?’ असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘तो लवंगी फटाका होता, तर तुम्ही एवढे का घाबरले?’
- शिवसेना सोडलेल्या नरेंद्र पाटलांचं ठरलं ! म्हणाले, ‘फडणवीस सांगतील तेव्हा…’
- मोठी बातमी : महाराष्ट्रातील ‘या’ १४ जिल्ह्यांमध्ये लागणार लॉकडाऊन?
- प्राजक्ता गायकवाडच्या क्युट कॉस्ट्यूम डिझायनरला पाहिलंत का?
- अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल सारखा गॉगल घालून सेल्फीची आनंद महिंद्रा यांची पोस्ट व्हायरल


