Share

मोठी बातमी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत राणेंचा शिवसेनेला धोबीपछाड

Published On: 

सिंधुदुर्ग : राणे कुटुंब आणि शिवसेना मधील वाद हा सबंध महाराष्ट्राला ठाऊक आहे. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून ते आतापर्यंत, राणे आणि शिवसेनेचं चांगलच बिनसलं आहे. भाजपची साथ सोडून शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. या सरकारच्या स्थापनेपासून खासदार नारायण राणे, आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांनी वारंवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह आघाडी सरकारला लक्ष्य केलं आहे.

दरम्यान, आज सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचं लक्ष होतं. शिवसेनेकडून वर्षा कुडाळकर तर भाजपकडून राणे समर्थक असलेल्या कणकवलीच्या संजना सावंत यांनी अर्ज दाखल केला होता. ही निवडणूक भाजप आणि शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची बनली होती. खासकरून राणे कुटुंबासाठी देखील ही निवडणूक महत्वाची होती.

या निवडणुकीत भाजपचा विजय झाल्याची माहिती निलेश राणे यांनी दिली आहे. ‘गल्लीत बसून भुंकणारे शिवसेनेचे आमदार, खासदार यांच्या नाकावर ठेचून राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकला. जिल्हा परिषद अध्यक्ष पदी सौ. संजना सावंत यांची निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन,’ असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!