Share

छत्रपती हॉस्पिटल आणि आशिर्वाद मेडिकलच्या वतीने पोलीस बांधवांना मास्क वाटप

Published On: 

बदनापूर : सबंध जगावर कोरोना व्हायरस सारख्या महामारीचे संकट घोंगावत असताना आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांना मास्क वाटप केले.

घरातून बाहेर न पडता आपण कोरोनाच्या लढाईत एकत्र आहोत, आणि योगदान देत आहोत, हे दाखवून देण्याची गरज असताना नागरिक मात्र सरकारच्या सूचनांची अवहेलना करत आहेत. कोरोना रोगाच्या आणीबाणी प्रसंगात देशभरात विविध संस्था, संघटना, व्यक्ती आणि समाज आपलं योगदान देत आहे. कोरोनासंदर्भात जनजागृती आणि उपाय करण्यासाठी झटत आहेत. या सर्वांबद्दल आपण सुजाण नागरिक म्हणून कृतज्ञता व्यक्त करायची आवश्यकता आहे. सध्या, देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना घरी बसण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पोलीस आणि डॉक्टर्स यांची ऑन ड्युटी २४ तास सेवा सुरू आहे. पोलीस दिवसरात्र सेवा बजावत आहेत. तर, डॉक्टर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारीही पायाला भिंगरी लावून, डोळ्यात तेल घालून नागरिकांच्या उपचारासाठी तयार आहेत.

देशभरातील बहुतांश मंदिरे बंद ठेवण्यात आली असून देऊळ बंद अशीच परिस्थिती दिसून येतेय. मात्र, देशातील हॉस्पीटल आणि पोलीस ठाणे मात्र सुरू आहेत. आपले कर्तव्य बजावताना, देशसेवेसाठी पांढरा कोट अन् खाकी वर्दी तैय्यार आहे. मात्र अशा परिस्थितीत ही पोलिस बांधवाना सरकारकडून मास्क आणि इतर आवश्यक गोष्टी पुरवण्यात आलेल्या नाहीत. जे पोलीस स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांची स्वतःच्या मुलांसारखी काळजी घेत आहेत. अशा महान पोलीस बांधवांना आज बदनापूर येथे छत्रपती हॉस्पिटल आणि आशीर्वाद मेडिकलच्या वतीने मास्क वाटप करून कृतज्ञता व्यक्त केली यावेळी छत्रपती हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ. रामेश्वर पाटील यांनी पोलीस बांधवांना कोरोना व्हायरस पसरवू नये म्हणून घ्यावयाची काळजी यासंबंधी मार्गदर्शन केले. यावेळी बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खेडेकर साहेब आणि कर्मचारी उपस्थित होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!