Share

मेकअप सुरू असताना अभिनेत्री सारा अली खानसोबत घडली अशी भयावह घटना

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) तिच्या वैयक्तिक आणि प्रोशनल आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांशी संवाद ही साधत असते. नुकतच सारासोबत चित्रपटाच्या सेटवर एक भयावह घटना (accident) घडली. त्यामुळे सारा खूप घाबरली. याच घटनेचा एक व्हिडीओ तिने शेअर करत माहिती दिली आहे.

दरम्यान अभिनेत्री सारा अली खानने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सारा मेकअप रूममध्ये टचअप करताना दिसतेय. तसेच मेकअप करताना ती गप्पा देखील मारतेय. यावेळी ती स्टाफ, जीतूला दोन नारळ पाणी आणायला सांगा…, असं ती म्हणतांना दिसतेय. यावेळी मेकअप आर्टिस्ट तिचा टच अप करत असताना अचानक बल्बचा ब्लास्ट (Horrible incident) होतो आणि तो फुटतो.

असं काही अचानक विचित्र घटना घडल्याने सारा यामुळे प्रचंड घाबरते. ती जोरात ओरडते. या धांदलीत कॅमेराही देखील खाली पडतो. याबद्दल ‘मॉर्निंग लाइक धिस’…, असं लिहित साराने हा व्हिडीओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे साराच्या चेहऱ्याजवळ बल्बचा ब्लास्ट झाला. सुदैवाने यात साराला कोणतीही इजा झाली नाही. यामुळे तिचे चाहते देखील विचारपूस करत कमेंट करत आहेत.

सध्या सारा अली खान सध्या इंदौरमध्ये आहे. तिथे अभिनेता विकी कौशलसोबत एका चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन व क्रिती सॅनन स्टारर ‘लुकाछिपी’चा सीक्वल असल्याचं बोललं जात आहे. मात्र अद्याप याबाबत अधिकृत खुलासा झालेला नाही. यापूर्वी सारा ‘अतरंगी रे’ हा सिनेमा रिलीज झाला होता. यात ती अक्षय कुमार व धनुषसोबत झळकली होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!