🕒 1 min read
अहमदनगर : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापिठातर्फे माजी केंद्रीय कृषीमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक विकासमंत्री नितीन गडकरी यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवीने सन्मानित करण्यात आले. विद्यापीठात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते आज गुरुवारी डॉ. नानासाहेब पवार सभागृहात ३५ व्या पदवीदान समारंभ पार पडला.
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा ३५वा दीक्षांत समारंभ आज संपन्न झाला. या समारंभात डॉक्टरेट ऑफ सायन्स या मानद पदवीने मला सन्मानित करण्यात आले. या बहुमानासाठी मी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा ३५वा दीक्षांत समारंभ आज संपन्न झाला. या समारंभात डॉक्टरेट ऑफ सायन्स या मानद पदवीने मला सन्मानित करण्यात आले. या बहुमानासाठी मी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो.@BSKoshyari @nitin_gadkari #felicitation pic.twitter.com/9GaoAb5fSY
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 28, 2021
कृषी विकास आणि कृषी तंत्रज्ञानाच्या प्रसारात अग्रेसर असणाऱ्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून हा गौरव प्राप्त होणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. मी कृतज्ञतापूर्वक या सन्मानाचा स्वीकार करतो. देशभरातल्या ज्या असंख्य शेतकऱ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून अलोट प्रेम केलं त्या शेतकऱ्यांना मी हा सन्मान समर्पित करतो अशा भावना यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केल्या.
महत्त्वाच्या बातम्या
- मोदी सरकारकडून साखर कारखान्यांना दिलासा, प्राप्तिकरातून कारखान्यांची सुटका
- शेतकऱ्यांची कोंडी करण्याचा आघाडी सरकारचा कट उघड झाला; ठाकरे सरकारवर भाजपची जोरदार टीका
- मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंदरस्ते योजना; राज्यात २ लाख किलोमीटरचे शेत, पाणंदरस्ते बांधणार
- ‘ड्रेसिंग हा माझा आवडता खेळ आहे..’मितालीच्या फोटो कॅप्शनने वेधले लक्ष
- ‘नका करू तोंडाची वाफ, होईल…’, ‘जलयुक्त’वरून राणेंचा आघाडीला टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

