मुंबई : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात राज्यात जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली होती. कॅगने ताशेरे ओढल्यानंतर सध्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारने या योजनेची चौकशी केली. त्याचा अहवाल आता आला असून त्यामध्ये दोष नसल्याचे आढळून आले असून उलट समितीने योजनेचे कौतूक केले आहे. यानंतर भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधण्यात येत आहे.
भाजप आमदार नितेश राणे यांनीही एका व्यंगचित्राच्या माध्यमातून राज्य सरकारला कोपरखळी मारली आहे.नितेश राणे यांनी केलेल्या एका ट्वीटमध्ये एक कार्टून दिसत आहे. जलयुक्त शिवार अभियान घोटाळाच्या या कार्टूनमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कॉंग्रेसचे नाना पटोले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अशी दिग्गज नेतेमंडळी यात आहेत. . या योजनेचा बॉम्ब न फुटता फक्त त्याची हवा निघून गेली असल्याने याचे हसे होत आहे, असे दाखवले गेले आहे.
नका करू तोंडाची वाफ…..होईल तुमच्याच जीवाला ताप….#BJPMaharashtra #Jalyuktshivar #Mahavikasaghadi pic.twitter.com/ZWaF3chn8H
— Nitesh Rane (@NiteshNRane) October 28, 2021
दरम्यान, जलयुक्त शिवार अभियानाच्या ७१ टक्के कामांमध्ये आर्थिक व प्रशासकीय अनियमितता झाल्याचा खुलासा जलसंधारण खात्याच्या वतीने करण्यात आला आहे. महालेखापालाने (कॅग) उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर विभागाच्या सचिवांच्या साक्षीवरून गैरसमज झाला असल्याचे जलसंधारण खात्याचे म्हणणे आहे. या अभियानाची सविस्तर चौकशी करण्यासाठी शासनाने एसआयटी नेमलेली होती. त्याप्रमाणे सुमारे ७१ टक्के कामांमध्ये आर्थिक व प्रशासकीय अनियमितता झाल्याचे स्पष्ट झालेले आहे.
सदर एसआयटीच्या अहवालाप्रमाणे शासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश यापुर्वीच दिलेले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी एसआयटीच्या निकषाप्रमाणे चौकशी अहवाल सादर केलेला नाही. ही सर्व चौकशी चालू असतांना शासनाने जलयुक्त शिवार अभियानाला क्लिनचिट देण्याचा प्रश्न येत नाही, असं महाविकास आघाडी सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मोदी सरकारकडून साखर कारखान्यांना दिलासा, प्राप्तिकरातून कारखान्यांची सुटका
- शेतकऱ्यांची कोंडी करण्याचा आघाडी सरकारचा कट उघड झाला; ठाकरे सरकारवर भाजपची जोरदार टीका
- मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंदरस्ते योजना; राज्यात २ लाख किलोमीटरचे शेत, पाणंदरस्ते बांधणार
- ‘एका महिलेवर खासगी हल्ले बाळासाहेबांना पटले असते का?’ क्रांती रेडकरचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
- ‘जलयुक्त’च्या ७१ टक्के कामांमध्ये आर्थिक व प्रशासकीय अनियमितता; जलसंधारण विभागाचा खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

