मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री मिताली मयेकर. मितालीने चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करून अवघ्या काही दिवसांत खूप लोकप्रिय आणि प्रसिद्ध झाली आहे. ती सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अशातच तिच्या चाहत्यांसाठी तिने नुकताच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवरील कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
सोशल मीडियावर मितालीने काही साडीमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाची सोनेरी काठ असलेली साडी नेसून त्यावर सोनेरी रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज घातले असून, यावर तिने कानात छोटेसे सोनेरी रंगाचे झुमके घातलेले दिसत आहेत. तसेच केस मागे बांधून कपाळी छोटीसी टिकली लावली आहे. या फोटोमध्ये ती अगदी साधी पण तितकीच सुंदर दिसत आहे.हा फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, ‘ड्रेसिंग हा माझा आवडता खेळ आहे.’ तिने शेअर केलेल्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्स येत आहे.
https://www.instagram.com/p/CViKk_yveMv/?utm_medium=copy_link
या फोटोवर चाहत्यांसह कलाकारांनी लाईक्स , कमेंट केली आहे. मितालीने ‘उर्फी’, ‘फ्रेशर्स’, ‘यारी दोस्ती’, ‘बिल्लू’, ‘आम्ही बेफिकीर’, ‘घेतला वसा टाकू नको’ अशा चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच तिने काही दिवसांपूर्वी झी मराठीवरील ‘लाडाची गं लेक मी’ या मालिकेत मुख्य भूमिकेत काम केले आहे. तसेच ती फोटो, व्हिडिओच्या माध्यमाने चाहत्यांशी कनेक्ट असते.
महत्त्वाच्या बातम्या
- मोदी सरकारकडून साखर कारखान्यांना दिलासा, प्राप्तिकरातून कारखान्यांची सुटका
- शेतकऱ्यांची कोंडी करण्याचा आघाडी सरकारचा कट उघड झाला; ठाकरे सरकारवर भाजपची जोरदार टीका
- मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंदरस्ते योजना; राज्यात २ लाख किलोमीटरचे शेत, पाणंदरस्ते बांधणार
- ‘एका महिलेवर खासगी हल्ले बाळासाहेबांना पटले असते का?’ क्रांती रेडकरचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
- ‘जलयुक्त’च्या ७१ टक्के कामांमध्ये आर्थिक व प्रशासकीय अनियमितता; जलसंधारण विभागाचा खुलासा


