Share

निराधारांचे मानधन रखडले; गाव सोडून इतर ठिकाणी रोजगारासाठी रवाना

Published On: 

नांदेड: जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील निराधारांना शासनाकडून मिळणारे मानधन मागील तीन महिन्यापासून रखडल्याने निराधारांना रोजगारा साठी गाव सोडून इतर ठिकाणी पोट भरण्यासाठी जावे लागत आहे. कोरोना काळातील लॉकडाउनमुळे अधीच रोजगार गेला आहे, त्यात मानधन रखडल्यामुळे निराधारावर उपासमारिची वेळ आली आहे.

कोरोना प्रादुर्भावात अनेकांचे रोजगार गेले. कमावणारे हात रिकामे झाले. नंतर ग्रामपंचायत निवडणुक आणि कोरोना संसर्गा मुळे शासनाने आपला निधी गोठवला आणि विकास कामे रखडली यामुळे मजुरांच्या हाताला काम मिळने बंद झाले. यामुळे काम शोधण्यासाठी अनेक जण गाव सोडून मुंबई, पुणे येथे रवाना झाले. गावात शाळकरी मुले व निराधार मंडळी शिल्लक आहेत. या निराधारांना शासनाकडून मासिक ६०० रुपये मिळत होते. , पण मागील तीन महिन्यापासून मानधन रखडले आहे.

यादरम्यान काही लोकप्रतिनिधी यांची भेट घेतात. चौकशी करतात, आणि मदत करण्याचे आश्वासन देतात. यावेळी ते स्वत:च्या प्रचारासाठी निराधारासोबत फोटो काढतात. ते फोटो छापून येतात मात्र मदत काही येत नाही. यामुळे मागील तीन महिन्यापासून तारीख-पे-तारीख प्रकारामुळे निराधारावर उपासमारीची वेळ आली आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!