औरंगाबाद : शहरात कोरोनाचे रूग्ण वाढतांना दिसत आहे. एकाच घरात तीन ते चार रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे महापालिकेने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. यापुढे ज्या भागात कोरोना रुग्ण आढळून येईल त्या रुग्णाची इमारत सील करुन त्याच्या घरावर येथे कोरोना रुग्ण आहे, असे स्टिकर लावण्यात येईल. राज्य सरकारच्या निर्देशानुसार पालिकेने उपाययोजना अधिक कडकपणे राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाचा एक रुग्ण आढळून आला तर त्याच्या संपर्कातील १९ व्यक्तींची आरटीपीसीआर पद्धतीने कोरोना चाचणी केली जाणार आहे. शहरात कोरोना रूग्ण वाढण्यास प्रमुख कारण हे नागरिक नियम पाळत नसल्याचे समोर येत आहे. बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होत आहे. मंगल कार्यालयात लग्नसमारंभ धडाक्यात होताना दिसत आहेत. त्यामुळेच आता कोरोनाचे रूग्ण वाढू लागले आहेत.
याविषयी पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी सांगिते की, शहरातील मेल्ट्रॉन व पद्मपुरा येथील कोविड केअर सेंटरमध्ये १८७ रुग्णांवर उपचार केले जात आहे. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने किलेअर्क आणि एमजीएम स्पोर्ट कॉम्पलेक्समधील कोविड केअर गरजेनुसार पुन्हा सूरू केले जातील. शहरातील १५ आरोग्य केंद्र आणि दोन कोविड सेंटरमध्ये दररोज एक हजार नागरिकांची कोरोना चाचणी केली जात आहे. असे त्यांनी स्पष्ट केले.
दोन मोबाइल पथके स्थापन
शहरात गर्दीच्या ठिकाणी व एखादया भागात कोरोना रुग्ण जास्त संख्येने आढळून आल्यास त्या भागात तपासणीसाठी दोन मोबाइल पथके तयार केली आहे. हे पथक गर्दीच्या ठिकाणी किंवा ज्या भागात कोरोना रुग्ण आढळून येतील, त्या भागात जावून नागरिकांची कोरोना चाचणी करतील.
महत्वाच्या बातम्या
- बंगालमध्ये भाजपा सरकार आल्यानंतर मच्छिमारांना दरवर्षी 6000 रुपये दिले जाणार- शाह
- पूजा चव्हाण प्रकरणातील संजय राठोड यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
- कोरोना वाढतोय ! महाविद्यालये सुरु करण्याबाबत फेरविचार होऊ शकतो : उदय सामंत
- राज्य कायद्याचे आहे पप्पा किंवा पप्पूचे नाही, भाजपची नाना पटोलेंवर जहरी टीका
- केंद्र सरकार विरोधात नागपूरमध्ये काँग्रेसची भव्य पदयात्रा


