Share

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राष्ट्रीय महागार्ग बंदचा इशारा; मराठा समाज आक्रमक

Published On: 

पुणे : सध्या राज्यात मराठा समाजाच्या शैक्षणिक आणि नोकर भरतीतल्या आरक्षणाला स्थगिती मिळाल्यावर राज्यात मराठा समाज संतप्त झाला आहे. ठिकठिकाणी मराठा समाजाकडून आंदोलनाची हाक दिली जात आहे. आंदोलनाच्या मैदानात आता मराठा क्रांती मोर्चानेही उडी घेतली आहे. पुण्यात गुरुवारी १७ तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयाला मराठा क्रांती मोर्चाने घेराव घालण्याचे नियोजन केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर निदर्शने केली जाणार आहेत. मराठा बांधवांनी भगवे झेंडे आणि काळ्या फिती हाती घेत आंदोलन करण्याचं आवाहन मराठा क्रांती मोर्चानं केले आहे. जर गुरुवारच्या आंदोलनानं प्रश्न सुटला नाही तर मग आमदार आणि खासदारांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन करुन जिल्ह्यातील राष्ट्रीय महागार्ग बंद करण्याचा इशारा हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे. प्रमुख पाच मागण्यांसह जिल्ह्याधिकारी कार्यालयाच्या बाहेर निदर्शने करणार असल्याची माहिती मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

पहा सविस्तर व्हिडिओ :

https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/953723798372463/

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!