मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वय नसल्याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. मुंबई पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या दहा पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या अवघ्या तीनच दिवसांत रद्द करण्यात आल्या आहेत. या अधिकाऱ्यांना पूर्वीच्या ठिकाणी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
‘भविष्यात निम्मी शिवसेना राष्ट्रवादी- काँग्रेस पोखरणार हे माझे शब्द लिहून ठेवा’
या बदल्या करताना मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करण्यात आली नव्हती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यातून उद्धव ठाकरेंनी आपली पॉवर दाखवली असून राष्ट्रवादीला धोबीपछाड दिला अशी चर्चा आहे. मुंबईतील करोनाचा वाढता कहर लक्षात घेता राज्य शासनाच्या गृह विभागाच्यावतीने बदल्यांचे आदेश जारी केले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेनेतील समन्वयाच्या अभावामुळं या बदल्या रद्द करण्यात आल्या असल्याचं बोललं जातंय.
पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा पुतळा उभारण्यासाठी शासनाकडे पैसे नाहीत : प्रा. हाके
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 2 जुलैला या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले होते. हे सर्व अधिकारी हे मुंबई पोलीस दलातले असून DCP दर्जाचे आहेत. आज या सर्व 10 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश रद्द करण्यात आलेत आणि त्यांना पुर्वीच्याच ठिकाणी राहण्यास सांगण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख आज संध्याकाळी उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. पोलिसांच्या बदल्या आणि लॉकडाऊन यावर या भेटीत चर्चा होऊन समन्वयाने काम कसे करता येईल याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.


