सोलापूर : सोलापूर विद्यापीठ अस्तित्वात आल्या नंतर या विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे यासाठी धनगर समाजाच्या वतीने लढा उभारला गेला. त्यासाठी अनेक आंदोलने झाली, मोर्चे काढले गेले आणि तत्कालीन सरकारने सोलापूर विद्यपीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी चे नाव जाहीर केले.
‘मुख्यमंत्री म्हणाले दादा तुम्हीच जा अन् थोडीतरी अब्रु वाचवा’, पारनेर प्रकरणावरून भाजपचा टोला
यानंतर आता विद्यापीठाच्या आवारामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा पुतळा उभा उभा रहावा आणि त्यांच्या कार्य कर्तुत्वाला शोभेल असे स्मारक उभे राहावे असे ठरले.यासंदर्भात सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूंनी या स्मरकासंदर्भात एक समिती स्थापन केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा स्मारकाला लोकवर्गणीतून निधी उपलब्ध करण्याचे आणि पुतळा उभा करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
ज्या ठिकाणी पुतळा होणार आहे ती जागा अजूनही वन विभागाच्या ताब्यात असल्याचं प्रा.लक्ष्मण हाके यांनी सांगितले आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन समिती समोर या विषयावर चर्चा झाली का ? विद्यापीठाचे नामांतर होऊन बराच कालावधी लोटला तरीही विद्यापीठाच्या लेटर हेड कुलगुरू बदलू का शकल्या नाहीत? हे आणि अश्या आशयाचे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या पुतळ्यासाठी लोकवर्गणी गोळा करावयाला लागणे म्हणजे महाराष्ट्र शासन निधी देण्यास उदासीन आहे की कुलगुरू यांनी तसा पाठपुरावा महाराष्ट्र शासनाकडे केला नाही याची उत्तरे कुलगुरू कडून अपेक्षित आहेत.
देश विरोधी काम करण्याऱ्या तब्बल ४० वेबसाईट्सवर केंद्राने घातली बंदी
वरील सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे कुलगुरू कडून अपेक्षित आहेत अन्यथा पुण्यश्लोक अहिल्यादेवी च्या पुतळ्या संदर्भात जर कोणी या विषयाचे राजकारण करत असेल तर सकल धनगर समाज या विषयावर व्यापक आंदोलन करेल असे ही प्रा लक्ष्मण हाके म्हणाले तशा आशयाचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पाठविले असल्याचे त्यांनी नमूद केले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

