Share

फडणवीसांनी ‘मुंगेरी लाल’ प्रमाणं सत्तेची स्वप्न पाहू नयेत, अनिल देशमुखांची घणाघाती टीका

Published On: 

पुणे : कोरोनाच्या थैमानाने राज्यातील जनता हैराण झाली आहे. अशावेळी सरकार आणि विरोधकांनी एकत्र येत काम करणे आवश्यक असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजकारण करीत आहेत. असा आरोप राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. ते पुण्यात बोलत होते.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी ‘मुंगेरी लाल’ प्रमाणं सत्तेची स्वप्न पाहू नयेत, असा टोला देखील अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, मंत्री विश्वजीत कदम हे देखील यावेळी उपस्थित होते.

राज्यात ४३ हजार ५९१ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

फडणवीसांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी राज्य सरकारला करोनाविरोधात लढ्यासाठी काही सूचना केल्या. तसेच अशा काळात कोणीही राजकारण करू, असंही त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आपल्या नेत्यांचं तरी त्यांनी अनुकरण करावं, असा सल्ला देशमुख यांनी फडणवीस यांना दिला.

देशमुख पुढे म्हणाले, करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कारागृहातून आत्तापर्यंत ९ हजार कैदी सोडण्यात आले आहेत. तसेच अजून ११ हजार कैदी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच आता नव्याने २४ जिल्ह्यात ३१ शाळांमध्ये तात्पुरते कारागृह तयार करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

ठाकरे सरकारने दोनशे कोटींचा कोहळा घेत २५ कोटींचा आवळा दिला, भाजपची जोरदार टीका

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!