Share

ठाकरे सरकारने दोनशे कोटींचा कोहळा घेत २५ कोटींचा आवळा दिला, भाजपची जोरदार टीका

Published On: 

सिंधुदुर्ग : निसर्ग चक्रिवादळामुळे नुकसान झालेल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी आज राज्य सरकारने अनुक्रमे ७५ आणि २५ कोटी रुपयांच्या तातडीच्या मदतीची घोषणा केली आहे. मात्र या मदतीवरून विरोधी पक्ष असलेल्या भाजपाच्या नेत्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ठाकरे सरकारने दोनशे कोटींचा कोहळा घेत २५ कोटींचा आवळा दिला, असा आरोप भाजपा नेते आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी केला आहे.

आज जाहीर करण्यात आलेल्या मदतीवर टीका करताना प्रमोद जठार म्हणाले की, ठाकरे सरकारने सिंधुदुर्गाचे हक्काचे २०० कोटी रुपये माघारी नेले आहेत. यातील १०० कोटी रुपये चांदा ते बांदा योजनेचे होते. तर १०० कोटी रुपये जिल्हा नियोजनाचे होते. हा २०० कोटी रुपयांचा कोहळा काढून घेत ठाकरे सरकारने २५ कोटींचा कोहला सिंधुदुर्गवासियांच्या हाती दिला आहे. ही मदत तुटपुंजी आहे. या तुटपुंज्या मदतीने काही होणार नाही. त्यापेक्षा जिल्ह्याचे नेलेले दोनशे कोटी रुपये परत द्या, अशी मागणी प्रमोद जठार यांनी केली.

दरम्यान, निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याप्रमाणे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही फटका बसला आहे. संकटाचे परिणाम गंभीर असले तरी सरकार पूर्ण ताकदीने कोकणवासीयांच्या पाठीशी उभे राहील असे सांगून तातडीची मदत म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीला ७५ कोटी रुपये व सिंधुदुर्गला २५ कोटी रुपये जाहीर केले होते. ठाणे व पालघर जिल्ह्यात तुलनेने कमी नुकसान झाले आहे मात्र तेथीलही आढावा घेतला जाऊन मग निर्णय घेतला जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले. हे पॅकेज नसून तातडीची मदत आहे असेही ते म्हणाले.

‘संजय राऊत चर्चेत राहण्यासाठी कधी काय करतील याचा अंदाजच लावू शकत नाही’

तर दुसरीकडे निसर्ग चक्रीवादळाचा कोकणाला मोठा फटका बसला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील शेती घरे आणि मालमत्तेचे 20 हजार कोटींपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. कोकणासोबत पुणे नाशिक आणि पालघर याभागात ही निसर्ग चक्री वादळाचा फटका बसला आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाने 5 हजार कोटींचा मदत निधी द्यावा तसेच तातडीने 1 हजार कोटी द्यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

कोकणात निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केवळ 200 कोटींची तातडीने दिलेली मदत अत्यल्प असून किमान 1 हजार कोटींची तातडीची मदत देणे आवश्यक होते असे रामदास आठवले म्हणाले.

कोकणात झालेल्या नुकसान भरपाईसाठी शासनाने 5 हजार कोटींची मदत द्यावी – रामदास आठवले

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!