Share

राज्यात ४३ हजार ५९१ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

Published On: 

मुंबई : राज्यात आज १९२४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३९ हजार ३१४ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ३००७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४३ हजार ५९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख ५१ हजार ६४७ नमुन्यांपैकी ८५ हजार ९७५ नमुने पॉझिटिव्ह (१५.५८ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ५८ हजार ४६३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७७ हजार ६५४ खाटा उपलब्ध असून सध्या २८ हजार ५०४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात ९१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- ७१ (मुंबई ६१, उल्हासनगर ५, मीरा-भाईंदर ४, पालघर १), नाशिक- १ (नाशिक १), पुणे- १४ (पुणे ६, सोलापूर ८), कोल्हापूर- २ (कोल्हापूर २), औरंगाबाद-१ (जालना १), अकोला-१ (अकोला मनपा १). इतर राज्य- १ (पश्चिम बंगाम मधील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईत झाला आहे.)

ठाकरे सरकारने दोनशे कोटींचा कोहळा घेत २५ कोटींचा आवळा दिला, भाजपची जोरदार टीका

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ६४ पुरुष तर २७ महिला आहेत. आज नोंद झालेल्या ९१ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ४६ रुग्ण आहेत तर ४१ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ९१ रुग्णांपैकी ६७ जणांमध्ये (७३.६ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३०६० झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३१ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू १३ एप्रिल ते ४ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ६० मृत्यूंपैकी मुंबई ४४, उल्हासनगर – ५, मीरा भाईंदर – ४, सोलापूर ४ , नाशिक -१ ,पालघर -१, इतर राज्ये -१,असे मृत्यू आहेत.

आजची संधी न दवडता मराठी युवकांनी तातडीने कंपन्या जॉईन कराव्यात – रोहित पवार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!