🕒 1 min read
मुंबई : मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे मैदानात उतरले. राज्यभर मेळावे घेतले. तसेच उपोषणाला देखील बसले. पण अजून देखील मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे संभाजी राजे नवीन पक्ष काढणार का? यावर सगळीकडे चर्चा सुरु आहे.
संभाजीराजे समर्थकांकडून चलो पुणे चा नारा देण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या भल्यासाठी नवी दिशा, नवा विचार, नवा पर्याय” अशा टॅगलाईन खाली पुण्यातील १२ तारखेच्या कार्यक्रमाला येण्याचं आवाहन केले आहे. तसेच संभाजी राजे राज्याचा दौरा करून राजकीय भूमिका जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उद्या छत्रपती संभाजी राजे प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. राजकीय पक्षच नव्हे तर सामाजिक संघटनाकडून देखील संभाजी राजेंना संपर्क करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यासंदर्भात संभाजी राजे १२ तारखेला पत्रकार परिषद घेणार आहेत.
काय म्हणाले शरद पवार ?
संभाजी राजेंचा कार्यकाळ संपत असताना त्यांना परत पाठींबा देण्याचा निर्णय केवळ एका पक्षाचा नाही. आम्हाला त्यासाठी काँग्रेस आणि शिवसेनेला देखील विचारावं लागेल. त्यामुळे एकत्र निर्णय घेऊ असे शरद पवारांनी म्हंटले आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

