🕒 1 min read
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) मंगळवारी धर्मशाला येथे भारतीय जनता पक्षाच्या (BJP) युवा मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यसमितीच्या अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याची चर्चा समोर आली होती. मात्र आता द्रविडनेच याबाबत खुलासा केला आहे. द्रविडने एएनआयला सांगितले, “मी १२ ते १५ मे या कालावधीत हिमाचल प्रदेशमध्ये होणाऱ्या सभेला उपस्थित राहणार असल्याचे वृत्त माध्यमांच्या एका वर्गाने दिले आहे. ही बातमी चुकीची असल्याचे मला स्पष्ट करायचे आहे.”
धर्मशाला येथील भाजप आमदार विशाल नेहरिया यांनी द्रविडबाबत दावा केला होता. “भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे अधिवेशन १२ ते १५ मे दरम्यान धर्मशाला येथे होणार आहे. या कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व आणि हिमाचल प्रदेशातील सर्व प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. या अधिवेशनात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, राष्ट्रीय संघटन मंत्री आणि केंद्रीय मंत्रीही सहभागी होणार आहेत”, असे नेहरिया म्हणाले होते.
India's head coach Rahul Dravid not to attend BJP event in Himachal, says 'reports incorrect'
Read @ANI Story | https://t.co/PeEfvGylmQ#RahulDravid #BJP #Himachal pic.twitter.com/jWmU4Sp5aZ
— ANI Digital (@ani_digital) May 10, 2022
या कार्यक्रमात द्रविडची उपस्थिती तरुणांना विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्याचा संदेश देईल, असा दावा नेहरिया यांनी केला होता. हिमाचल प्रदेशमध्ये या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. २०१७च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये, भाजपने ४४ जागा जिंकल्या तर कॉंग्रेसला एकूण ६८ विधानसभा जागांपैकी २१ जागा मिळाल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

