मुंबई : साकीनाका येथे घडलेल्या एका घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली आहे. साकीनाका येथील एका 32 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या अत्याचारानंतर महिलेला अमानुषपणे मारहाण देखील करण्यात आली होती. दुर्दैवाने पीडित महिलेचा मृत्यू झाला असून या भयंकर घटनेवर राज्यभारात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर ‘शक्ती कायदा’ लागू करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.
याच पार्श्वभूमीवर अआज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘मुंबईतील साकीनाका परिसरात घडलेली बलात्काराची घटना माणुसकीला काळिमा फासणारी घटना असून अश्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी कायद्याचा जरब आवश्यक आहे. महाविकास आघाडी सरकार राज्यात शक्ती कायदासंदर्भात काही सजेशन्स होते. त्यासंदर्भात मंत्रिमंडळात चर्चा पण झाली असून लवकरच याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात गृह विभाग आणि मुख्यमंत्री निर्णय घेतील.’ असा ठाम विश्वास राजेश टोप यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे.
तर ‘साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य आहे. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवून गुन्हेगारास कठोरात कठोर शिक्षा केली जाईल’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसेच तपासाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अरब राष्ट्रांप्रमाणे बलात्काऱ्यांना भर चौकात फाशी देता येणार नाही का?’, खा.जलील यांची संतप्त प्रतिक्रिया
- निवडणुकांना वेळ आहे, चर्चा करून ओबीसी समाजाला न्याय देऊ-बाळासाहेब थोरात
- शिवसेनेत अंतर्गत धुसफूस? संजय राऊतांच्या ‘त्या’ घोषणेमुळे शेकडो उमेदवारांचा जीव टांगणीला
- सुप्रीम कोर्टाचा निवडणुकीवर निकाल; प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘हे तर कायदेशीर दृष्ट्या अयोग्य’
- ‘मुख्यमंत्री कारवाई करणार की घरातच बसून फेसबूक लाईव्ह करणार आहेत?’


