Share

‘अरब राष्ट्रांप्रमाणे बलात्काऱ्यांना भर चौकात फाशी देता येणार नाही का?’, खा.जलील यांची संतप्त प्रतिक्रिया

Published On: 

औरंगाबाद : मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणाने मुंबई हादरली असून या प्रकरणी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घातले आहे. पीडितेच्या कुटुंबीयांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. त्यांनी शनिवारी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याशीही या प्रकरणाबाबत चर्चा केली. तसेच ठाकरे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली होती. ‘एका महिन्याच्या आत आरोपीवर दोषारोपपत्र दाखल करावे, जलदगती न्याय काय असतो ते अशा नरराक्षसांना दाखवून द्यावे जेणे करून पुढे कुणी अशी हिंमत करणार नाही’, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी पोलिसांना दिलेत.

दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे यांनी घटनेची तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे ट्विट केल्यानंतर त्याला शेअर करत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनीही एक विशेष मागणी केली आहे. या घटनेमुळे समाजात संतापाचे वातावरण आहे. आरोपीला फाशीच झाली पाहिजे, अशी मागणी सर्वच स्तरातून आहे. त्याच अनुषंगाने खा.जलील यांनी एक ट्विट केले आहे.

‘साकीनाका येथील घटना दुर्दैवी, चीड आणणारी आणि विकृत मानसिकतेचा कळस गाठणारी आहे. मला माहिती आहे की, आपल्या देशात कायदेशीररित्या या गोष्टीला परवानगी नाही. पण बलात्कारासारख्या घटना रोखून नराधमांवर वचक बसवायचा असेल तर अरब राष्ट्रांप्रमाणे अशा गुन्हेगारांना भर चौकात थेट फाशी देण्याची तरतूद कायद्यात करायला हवी’, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

अरब राष्ट्रांमध्ये महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना जशी भरचौकात फाशीची शिक्षा दिली जाते. तशीच तरतूद आपल्या कायद्यात करता येणार नाही का? असा सवाल त्यांनी ट्विटद्वारे उपस्थित केला आहे. ‘मला माहित आहे की कायदेशीररित्या आपल्या देशात याला परवानगी नाही. पण आम्ही गुन्हेगारांना मुख्य शहर जंक्शनवर पूर्ण सार्वजनिक दृष्टिकोनात फाशी देण्यासाठी कायद्यात सुधारणा करू शकत नाही का? जसे अत्याचार करणाऱ्यांसाठी काही कायदे अरब देशात केले जातात. कायद्याला घाबरत नाही अशा व्यक्तींसाठी हे एक मजबूत प्रतिबंधक पाऊल ठरू शकेल’.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!