Share

‘शक्ती कायद्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात मुख्यमंत्री आणि गृह विभाग निर्णय घेणार’

Published On: 

मुंबई : साकीनाका येथे घडलेल्या एका घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली आहे. साकीनाका येथील एका 32 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या अत्याचारानंतर महिलेला अमानुषपणे मारहाण देखील करण्यात आली होती. दुर्दैवाने पीडित महिलेचा मृत्यू झाला असून या भयंकर घटनेवर राज्यभारात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर ‘शक्ती कायदा’ लागू करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

याच पार्श्वभूमीवर अआज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘मुंबईतील साकीनाका परिसरात घडलेली बलात्काराची घटना माणुसकीला काळिमा फासणारी घटना असून अश्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी कायद्याचा जरब आवश्यक आहे. महाविकास आघाडी सरकार राज्यात शक्ती कायदासंदर्भात काही सजेशन्स होते. त्यासंदर्भात मंत्रिमंडळात चर्चा पण झाली असून लवकरच याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात गृह विभाग आणि मुख्यमंत्री निर्णय घेतील.’ असा ठाम विश्वास राजेश टोप यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे.

तर  ‘साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य आहे. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवून गुन्हेगारास कठोरात कठोर शिक्षा केली जाईल’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसेच तपासाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले आहेत.

 

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!