Share

सलग सुट्टया, एसटीच्या ज्यादा बसेस सोडण्याचा निर्णय!

Published On: 

औरंगाबाद : आठवड्याच्या शेवटी घेतला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर एसटी महामंडळाचे अतोनात आर्थिक नुकसान झाले होते. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर अंतर हळूहळू एसटी बस सेवा पूर्ववत होताना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आता प्रवाशांची संख्याही वाढू लागल्याने सलग तीन दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे राज्यातील विविध मार्गांवर औरंगाबाद होऊन ज्यादा बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळातर्फे देण्यात आली.

औरंगाबाद शहरात असलेल्या मध्यवर्ती बस स्थानक आणि सिडको बस स्थानकातून शनिवारपासून जास्तीच्या बसेस सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एसटी महामंडळाची बस सेवा अत्यावश्यक सेवेत असली तरी कोरोनामुळे घराबाहेर पडणे व प्रवास करणे टाळले जात होते त्यामुळे एसटीला प्रवासी सेवा बंद करावी लागली. तब्बल अडीच महिन्यांच्या विश्रांतीनंतर एक जून पासून लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.

त्यामुळे अनेक प्रवासी कामानिमित्त विविध ठिकाणी जाण्यासाठी आता एसटी बसकडे वळले आहे. हळूहळू प्रवासी आणि उत्पन्नात वाढ होताना दिसून येत आहे. शनिवार, रविवार आणि सोमवारी तीन दिवस आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे तसेच लग्नतिथी सण-समारंभ पाहता प्रशासनातर्फे जास्तीच्या बस सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सिल्लोड, वैजापूर सह जळगाव, धुळे, पुणे, जालना, अकोला, बीड या शहरांमध्येही जास्तीच्या बसेस सोडण्यात येत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!