Share

अतिवृष्टीमुळे पुण्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: पुणे आणि परिसरात मुसळधार पावसामिळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे आंबील ओढ्याला आलेल्या पुरात सहकारनगर येथील टांगेवाले कॉलनीमधील दहा जणांचा मृत्यू झाला. हवामान खात्याकडून आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे शहरासह पाच तालुक्यातील शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे.

बुधवारी झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये. अतिवृष्टीमुळे आपत्त्कालीन परिस्थिती निर्माण झालेली असल्याने त्याचा परिणाम शालेय विद्यार्थी यांच्यावर होऊ नये, याकरिता पुणे जिल्ह्यातील पुणे शहर, हवेली, पुरंदर, भोर आणि बारामती या तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालये यांना आज सुट्टी घोषित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम ही माहिती दिली.

पुणे शहराच्या दक्षिण भागामध्ये बुधवारी रात्री पाच – सहा तास मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे कात्रज, सहकारनगर, बिबवेवाडी, सिहगड रस्ता परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते. त्यामुळे असंख्य गाड्यांचे नुकसान झाले आहे. जनता वसाहत परिसरातील नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.

अरणेश्वर भागामध्ये टांगेवाले कॉलनीजवळून वाहणाऱ्या पाण्याने रौद्ररूप धारण केले होते. त्यामुळे अनेक घरांच्या भिंती खचल्याने पडझड झाली. यामध्ये दहा जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत पाच मृतदेह आढळले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1177087839785193472?s=20

 

https://twitter.com/Maha_Desha/status/1176867458910576640?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1176861157191081984?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!