🕒 1 min read
मुंबई : येत्या ९ एप्रिल पासुन आयपीएलचे १४वे सत्र सुरु होत आहे. भारताचा धडाकेबाज सलामीवीर आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये दाखल झाला आहे. यंदाची आयपील ट्रॉफी जिंकुन मुंबई इंडियन्स आयपीएलमध्ये हॅटट्रीक साधण्याच्या दृष्टीने उतरणार आहे आणि कर्णधार रोहित शर्माही यासाठी कसोशीने प्रयत्न करणार आहे.
९ एप्रिल पासुन सुरु होत असलेल्या आयपीएल च्या सत्रासाठी विविध संघाचे सराव शिबीर सुरु झाले आहे. मुंबई इंडियन्सचे सराव शिबीर हे मुंबईतच आयोजीत करण्यात आले आहे. नुकताच रोहित मुंबई इंडियन्सच्या शिबीरात दाखल झाला. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम या सोशल मीडीयावरुन याबद्दल माहिती दिली आहे. रोहित व्यतिरीक्त या शिबीरात हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या आणि सुर्यकुमार यादव हे दाखल झाले आहे.
https://www.instagram.com/p/CNAA65chb29/?igshid=1exk0ls2x3yp3
यंदाच्या सत्रासाठी मुंबई इंडियन्सच्या संघाने नवीन जर्सीही लाँच केली आहे. ब्रम्हांडातील पंचमहाभुत असलेल्या पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश हे या जर्सीवर दाखवण्यात आलेले आहे. यंदाच्या सत्राचा पहिला सामना हा मुंबई इंडियन्स आणि विराट कोहलीचा आरसीबी या दोन संघादरम्यान ९ एप्रिल रोजी होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पंढरपूर पोटनिवडणूक : भाजपचं ठरल ! ‘हा’ नेता उद्या भरणार उमेदवारी अर्ज
- ऑपरेशन लोटस सुरु ? चंद्रकांतदादा म्हणाले, पहाटेच्या शपथविधी सारखं समजेलच !
- नांदेड जिल्हा; सिलिंडरच्या स्फोटात ३ घरे भस्मसात
- ‘…आता तरी रहस्य कथेचा शेवट करा’; शाह-पवारांच्या भेटीवर संजय राऊतांच भाष्य
- ‘बांगलादेश स्वातंत्र्यसंग्रामातील सैनिक म्हणून मोदींना गौरवाचा ताम्रपट मिळायला हवा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
