Share

अनिल देशमुख यांना दणका; हायकोर्टाकडून समन्स रद्द करण्यास नकार

Published On: 

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना पैशांच्या गैरव्यवहाराप्रकरणी ईडी गेल्या अनेक दिवसांपासून नोटीस बजावत आहेत. त्यांच्या निवासस्थानी छापेमारी देखील करण्यात आली. परंतु ते चौकशीसाठी ईडीसमोर हजर झालेले नव्हते. दरम्यान, ईडीने समन्स बजावल्यानंतर अनिल देशमुख यांनी या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. परंतू आज न्यायालयाने देशमुख यांना दिलासा नाकारत समन्स रद्द करण्यास नकार दिला. तसेच कारवाईपासून संरक्षण हवे असल्यास तो विशेष न्यायालयात जाऊ शकतो, असे हायकोर्टाने सांगितले.

मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याकाठी १०० कोटी रुपये गोळा करण्यास सांगितले होते, असा दावा सिंह यांनी पत्रात केला. तसंच देशमुख हे पोलीस कामकाजातही सतत ढवळाढवळ करत होते, असेही त्यांनी पत्रात नमूद केलं होतं. त्या अनुषंगाने कारवाई करण्यात येत आहे.

मात्र, गेल्या काही महिन्यांपासून अज्ञातवासात असलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा शोध घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांच्या हालचाली पुन्हा वाढल्या आहेत. त्यांचा ठावठिकाणा मिळविण्यासाठी सक्तवसुली संचालनालय, (ईडी) केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला (सीबीआय) कळविण्यात आले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे येत्या काही दिवसांत त्यांना पकडण्यासाठी मुंबई, नागपूर या ठिकाणी सीबीआयकडून छापेमारी केली जाण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!