Share

‘एसटी कर्मचाऱ्यानं केलेली आत्महत्या दुर्दैवी, कोणत्याही कर्मचाऱ्यांनं टोकाचं पाऊल उचलू नये’

Published On: 

अहमदनगर-  एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. आता पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव  येथील परिवहन महामंडळाच्या चालकाने आगारात उभ्या असलेल्या एसटीच्या मागच्या भागाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृतक एसटी कर्मचाऱ्याचे नाव दिलीप हरिभाऊ काकडे असे आहे. दिलीप काकडे हे परिवहन महामंडळात चालक म्हणून कार्यरत होते. शेवगाव येतील एसटी डेपोत उभ्या असलेल्या बसच्या मागच्या बाजूला गळफास घेत त्यांनी आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

काकडे यांच्या सेवानिवृत्तीला चारच वर्षे राहिली होती. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. तालुक्यातील आव्हाने या गावाचे ते रहिवाशी आहेत. त्यांनी आत्महत्या का केली, हे अद्याप समजू शकले नाही. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांच्या आतापर्यंत झालेल्या आत्महत्यांमागे आर्थिक विवंचनेचे कारण असल्याचे पुढे आले आहे, तेच यामागेही असावे असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.दरम्यान, या सर्व प्रकारानंतर आता सरकारवर टीका होऊ लागली आहे.

भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली असून कर्मचाऱ्यांसाठी संघर्ष देखील करु असं म्हटलं आहे. दुसऱ्या बाजूला एसटी कर्मचाऱ्यानं केलेली आत्महत्या दुर्दैवी आहे. याबाबत मी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांसोबत बोललो आहे. कोणत्याही कर्मचाऱ्यांनं टोकाचं पाऊल उचलू नये. एसटी रूळावर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. रत्नागिरी येथे ते बोलत होते. शिवाय, सध्याचा काही ठिकाणी सुरू असलेल्या संपाबाबत देखील मी कर्मचाऱ्यांशी, त्यांच्या संघटनांशी बोलत आहे. तसेच एसटीच्या विलिनीकरणाचा निर्णय राज्य सरकार घेईल असं देखील यावेळी परब यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!