नवी दिल्ली : भारत- चीनमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या भूमिकेवरील टिकास्त्र सुरूच ठेवले असून आज त्यांनी ‘नरेंद्र मोदी हे प्रत्यक्षात सरेंडर मोदी आहेत,’ अशी खोचक टीका केली आहे.
Narendra Modi
Is actually
Surender Modihttps://t.co/PbQ44skm0Z
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 21, 2020
‘जपान टाईम्स’मधील एका लेखाची लिंक शेअर करत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी हे खरं तर सरेंडर मोदी आहेत, असं राहुल गांधी यांनी ट्विटरवर लिहिलं आहे.
विकासकामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्यावर भर द्या – अजित पवार
राहुल गांधी यांनी शनिवारीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. चीनच्या आक्रमणापुढे पंतप्रधानांनी भारतीय भूमी सरेंडर केली, असं ट्विट करत मोदींवर हल्ला चढवला होता. शिवाय त्यांनी काही प्रश्नही उपस्थित केले होते. “जर ती जमीन चीनची होती तर, भारतीय जवान का शहीद झाले? आणि ते कोठे शहीद झाले?” असे सवाल देखील उपस्थित केले होते.
देश के लोकप्रिय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी के लिए जिन शब्दों का इस्तेमाल राहुल गांधी कर रहे हैं,वैसे अपमानजनक शब्दों का इस्तेमाल दुश्मन देश का नेता भी भारत के प्रधानमंत्री के लिए नही करता,लेकिन राहुल गांधी लगातार 'प्रधानमंत्री' और 'देश' दोनों का अपमान करते जा रहे हैं। pic.twitter.com/fBjg04wF0R
— Syed Shahnawaz Hussain (@ShahnawazBJP) June 21, 2020
दरम्यान, भाजपने राहुल गांधींच्या टीकेला उत्तर दिले आहे. राहुल गांधी यांच्या ट्विटला भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनीही उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, राहुल गांधी ज्या अपमानास्पद शब्दांचा वापर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी करत आहेत, तसा वापर शत्रू राष्ट्रातील नेतेही करत नाहीत. पंतप्रधान आणि देशाचा राहुल गांधी सातत्याने अपमान करत आहेत. त्याचबरोबर राहुल गांधी यांनी सरेंडरच्या स्पेलिंगमध्ये चूक केल्याचे काही नेटकऱ्यांनी म्हटले आहे. आता त्यांना त्यावरुन ट्रोल केले जात आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

