Share

औरंगाबादेत ६१७ नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची भर, सहा जणांचा मृत्यू

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : जिल्ह्यात गेल्या २४ तासात ६१७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर उपचार घेणाऱ्या ६ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ५५ हजार ९५८ वर पोहोचली आहे, तर बळींचा आकडा १ हजार ३२६ वर पोहोचला आहे. शुक्रवारी सापडलेल्या बाधित रुग्णांपैकी ५०५ जण मनपा हद्दीतील, तर ११२ ग्रामीण भागातील आहेत.

दरम्यना, शुक्रवारी दिवसभरात मनपा हद्दीतील २०८, तर ग्रामीण भागातील ७० अशा २७८ रुग्णांना यशस्वी उपाचारनंतर डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ५० हजार १६८ वर पोहोचली आहे. तर जिल्ह्यात सध्या ४ हजार ४६४ जणांवर उपचार सुरू आहेत.

मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश
गाढेजळगाव येथील ६५ वर्षीय महिला, कोहिनूर कॉलनी येथील ७४ वर्षीय पुरुष, दक्षिण जायकवाडी पैठण येथील ६८ वर्षीय पुरुष, हडको औरंगाबाद येथील ७४ वर्षीय पुरुष यांचा घाटीत मृत्यू झाला, तर न्यू मोंढा जाधववाडी येथील ५८ वर्षीय महिला, मकसूद कॉलनी येथील ५९ वर्षीय महिला यांचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.

मनपा हद्दीत आढळलेले रुग्ण
घाटी परिसर (३), जुना बाजार (१), विश्वभारती कॉलनी (१), एन-२ सिडको (१०), बीड बायपास परिसर (१०), जयभीमनगर (३), नारेगाव (१), शहानूरवाडी (५), म्हाडा कॉलनी (५), गारखेडा (१४), सातारा परिसर (८), शंभुमहादेवनगर (१), संजयनगर (४), ज्योतीनगर (३), आकाशवाणी (२), पैठण रोड परिसर (२), पिसादेवी (१), साई स्पोर्ट्स‌् ॲथॉरिटी (१), छावणी (१), मनीषा कॉलनी (२), उस्मानपुरा (१), श्रेयनगर (५), वेदांतनगर (३), गजानननगर (३), टिळकनगर (२), क्रांती चौक परिसर (२), स्नेहनगर (२), सिल्कमिल कॉलनी (१), कांचनवाडी (२), कर्णपुरा (१), नागेश्वरवाडी (५), टीव्ही सेंटर (४), जाधववाडी (६), बाबा पेट्रोल पंप (१), बजाज हॉस्पिटल (२), मुकुंदवाडी (८), एकता कॉलनी (१), खडकेश्वर (२), टाइम्स कॉलनी (१), नागसेन कॉलनी (१), लक्ष्मी कॉलनी (१), एआयएमएस हॉस्पिटल (१), माजी सैनिक कॉलनी (१), शिवाजीनगर (३), खोकडपुरा (१), हनुमाननगर (४), चंद्रगुप्तनगरी (१), दशमेशनगर (६), सिडको (१), एन-४ सिडको (२), आंबेडकरनगर (१), कैलासनगर (१), मयूर पार्क (२), विद्यापीठ गेट (१), पडेगाव (४), नंदनवन कॉलनी (२), नक्षत्रवाडी (१), बन्सीलालनगर (३), देवानगरी (१), हर्सूल (६), जवाहर कॉलनी (२), शिल्पनगर (१), तुकोबानगर (१), विठ्ठलनगर (२), जयभवानीनगर (४), एन-३ सिडको (१), ज्ञानेश्वरनगर (१), चिकलठाणा (४), हडको (८), पुंडलिकनगर (६), विश्रांतीनगर (१), भारतनगर (१), औरंगपुरा (३), गणेशनगर (१), एन- नऊ (६), सावरकरनगर (१), रेल्वेस्टेशन परिसर (३), गुलमोहर कॉलनी (३), एन-सहा सिडको (१०), योगता सोसायटी (१), पवननगर (१), एन- सात सिडको (३), एन-८ (३), एन- १२ (५), जटवाडा परिसर (२), साफल्यनगर (१), विशालनगर (१), देशमुखनगर (१), बालाजीनगर (४), नयननगर (१), विमानतळ (१), शेंद्रा (१०), खिंवसरा पार्क (१), सेव्हन हिल्स (२), शिवशंकर कॉलनी (३), प्रतापनगर (१), ‍विष्णुनगर (२), शास्त्रीनगर (१), नाथनगर (१), अलंकार सोसायटी (१), कासलीवाल कॉम्प्लेक्स (१), निराला बाजार (१), गुलमंडी (३), एएस क्लब (१), एसबी कॉलनी (१), एल अँड कंपनी (२), देवगिरी आरएम (१), गादिया विहार (१), उल्कानगरी (४), उस्मानपुरा (१), गजानन कॉलनी (१), एपीआय कॉर्नर (१), न्यू शांतिनिकेतन कॉलनी (१), मोरेश्वर सो. (११), ग्रीनलाइफ (१), समर्थनगर (३), अजबनगर (१), सुंदरवाडी (१), मोंढा नाका (१), एमजीएम होस्टेल (२), नारायण प्लाझा (१), महेशनगर (१), दर्गा रोड परिसर (२), रामनगर (१), व्यंकटेशनगर (१), एन-१ सिडको (१), बजरंग चौक (२), सूतगिरणी चौक (२), मिसारवाडी (१), संघर्षनगर (१), रत्नप्रभा शोरूम (१), सुराणानगर (१), पदमपुरा (१), अाविष्कारनगर (१), मजनू हिल (१), विश्वभारती कॉलनी (१), एन-१३ (१), पहाडसिंगपुरा (१), दुर्गामाता कॉलनी (३), सौजन्यनगर (१), आंबेडकरनगर एन-सात (२), अन्य (१६१).

ग्रामीण भागातील रुग्ण
लोहगड (१), वाळूज महानगर (६) , इटखेडा (४), बजाजनगर (२३), खुलताबाद (१), रांजणगाव (१), कन्नड (२), लासूर स्टेशन (१), पिंप्री राजा (१), श्यामवाडी (१), सावंगी (१), पांढरी (१), वडगाव (६), पंढरपूर (१), प्रताप चौक (३), अन्य (५८)

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!