Share

जिल्हा प्रारूप आराखडा बैठकीस हिंगोलीच्या पालकमंत्र्यांची दांडी

Published On: 

औरंगाबाद : महाराष्ट्राचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शहरात जिल्हा वार्षिक योजनेची बैठक पार पडली. यावेळी मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांचे पालकमंत्री हजर होते. परंतु हिंगोलीच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड गैरहजर होत्या. औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारूप आराखडा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख, औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई, जालन्याचे राजेश टोपे, नांदेडचे अशोक चव्हाण, लातूरचे अमित देशमुख, बीडचे धनंजय मुंडे, परभणीचे नवाब मलिक आदी हजर होते. या प्रारूप आराखडा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता दिली.

यानुसार हिंगोली जिल्ह्यास 160 कोटी, उस्मानाबाद जिल्ह्यास 280 कोटी, लातूर 275 कोटी, बीड 340 कोटी, नांदेड 355 कोटी, परभणी 225 कोटी, जालना 260 कोटी, तर औरंगाबादसाठी 365 कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, जिल्ह्यात रस्ते, आरोग्य, जलसंधारण यासह सर्व आवश्यक बाबींच्या पूर्तततेसाठी गुणवत्तापूर्ण कामे करण्याकरिता निधीचा योग्य वापर करावा. चालू आर्थिक वर्षात उपलब्ध करून दिलेला निधी वेळेत खर्च करावा, असे निर्देश दिले. लोकप्रतिनिधी आणि यंत्रणांनी समन्वयातून विकास कामांवर निधीचा योग्यरीत्या वापर करावा, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी म्हटले.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!