Share

पुणेकरांनो काळजी घ्या : कोरोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा हजार पार

Published On: 

मुंबई : संपूर्ण देशभरात कोरोना व्हायरस या महामारीने हाहाकार माजवला आहे. या महामारीमुळे आतापर्यंत जगात ९७ हजर लोकांचा बळी गेला आहे. या रोगांमुळे २९ लाख जणांना संक्रमित केलं आहे. जगात सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेतील मृत्यूची संख्या ५० हजारांच्या पुढे गेली आहे.

महाराष्ट्रात देखील मुंबई, पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोनाने चांगलेच हात पाय पसरले आहेत. पुण्यातील एकूण कोरोना रुग्णांची 1 हजार 184 इतकी झाली आहे. आता एकूण मृतांचा आकडा 72 वर पोहचला आहे.

तसेच शनिवारी पुणे जिल्ह्यात 90 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झालीय. गेल्या 3 दिवसांपासून पुण्यातील रुग्णांची संख्या आणि मृत्यूचा आकडा कमालीचा वाढतोय. 3 दिवसात तब्बल 298 नवीन रुग्णांची भर पडली आहे, तर 13 रुग्णांचा मृत्यू झालाय.

दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून सर्वोत्तोपरी मेहनत घेतली जात आहे. देशभरातील सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर, पोलीस रात्रंदिवस मेहनत घेत आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!