Share

घरकुल घोटाळा प्रकरण: गुलाबराव देवकरांना उच्च न्यायालयाचा दिलासा

Published On: 

जळगाव : धुळ्याच्या विशेष न्यायालयाने घरकुल प्रकरणात जळगाव राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर(Gulabrao devkar) यांना दिलेल्या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती मिळाली असून जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विरोधी उमेदवाराने देवकर यांच्या विरोधात दाखल केलेली याचिका देखील न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

तसेच देवकर यांनी नुकताच जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. परंतु,घरकुल प्रकरणात धुळे न्यायालयात सुरु असलेल्या खटल्यासंदर्भात जिल्हा बँकेच्या संचालक निवडणुकीत गुलाबराव देवकर यांच्या निवडीवर टांगती तलवार होती.परंतु धुळ्याच्या विशेष न्यायालयाने घरकुल प्रकरणात देवकरांना दिलेल्या शिक्षेस मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने आणि त्यांच्या जिल्हा बॅंकेच्या उमेदवारी अर्जावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

दरम्यान, न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार देऊन याचिका फेटाळून लावल्याने देवकर यांचे जिल्हा बँकेचे संचालक पद अबाधित झाले असून जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी देखील त्यांचे नाव चर्चेत असल्याने यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग देखील मोकळा झाला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!