Share

मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे चुकते करा; डीएसकेंना उच्च न्यायालयाचे आदेश

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: गुंतवणूकदारांचे पैसे थकवल्या प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांना उच्च न्यायालयाने अजून एक दणका दिला आहे. आतापर्यंत काय केले ते सांगू नका, ठेवीदारांचे पैसे कधी आणि कसे देणार ते सांगा, असे बजावताना न्यायमूर्ती अजय गडकरी यांनी कुलकर्णी यांना स्थावर मालमत्ता आणि उर्वरीत गुंतवणूकदारांचे पैसे यांचा तपशील सादर करून किमान 50 टक्के रक्कम तातडीने जमा करा असे निर्देश उच्च् न्यायलयाने दिले आहेत. त्याचबरोबर अर्जाची पुढील सुनावणी 30 नोव्हेंबरपर्यंत तहकूब ठेवली आहे.

पुणे जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्यावतीने अॅड. मनोज मोहिते यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जावर गुरूवारी न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी कुलकर्णी यांच्यावतीने अॅड. अशोक मुदरवी यांनी युक्तीवाद करताना 35 कोटी न्यायालयात जमा करण्याची तयारी दर्शविली. मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे परत करण्याचे अश्वासन त्यांनी दिले. तसेच पोलिसांनी सर्व मालमत्ता सिल केल्याने आम्ही तातडीने पैसे देऊ शकत नसल्याची माहिती देखील मुदरवी यांनी न्यायलयात दिली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!