Share

कोरोना वाढतोय ! महाविद्यालये सुरु करण्याबाबत फेरविचार होऊ शकतो : उदय सामंत

Published On: 

मुंबई : कोरोनाचं संकट महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा डोकं वर काढत असताना दिसतंय. राजकीय पक्षांचे कार्यक्रम, लग्न समारंभ, सार्वजनिक ठिकाणी नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधक नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. यामुळेच महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसून येत आहे.

कोरोना वाढत असेल तर महाविद्यालये सुरु करण्याबाबत फेरविचार केला जाउ शकतो असे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. ‘लोकमत’ शी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालये सुरु करायचे का नाही याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. स्थानिक परिस्थितीचा आढावा घेउन जिल्हाधिकारी निर्णय घेतील असं त्यांनी स्पष्ट केले आहे. महाविद्यालयांनी विद्यार्थांना उपस्थिती सक्तीची करु नये असेही ते म्हणाले.

ऑनलाईन परीक्षांबाबत येणाऱ्या अडचणींसाठी एक समिती नेमली होती. या अडचणी एका महिन्यात त्याचा अहवाल येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “परीक्षांमध्ये काय अडचणी आल्या याबाबत एक समिती नेमली आहे. या समितीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंग माध्यमातून सर्व विद्यापिठांचा आढावा घेण्यास सांगितले आहे. ते महिनाभरात याबाबतचा देतील. त्यानंतर जर कोण दोषी आढळेल तर त्यांच्यासह कारवाई होईल”  असेही सामंत यांनी यावेळी सांगितले.

सामंत म्हणाले, कोरोना गेला आहे असे जर कोणाला वाटत असेल तर तसं नाहीये. संख्या वाढते आहे. आणि हे लक्षात घेता आज विद्यापीठांना देखील आमच्या सुचना गेल्या आहेत. जर हे असेच कायम राहिले तर उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाला काही विचार करावा लागेल. कॉलेज उघडण्याबाबत नक्कीच फेरविचार करु शकतो. स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत अधिकार दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेवुन विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा. त्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पर्याय विद्यापीठांनी उपलब्ध करुन द्यावेत. विद्यार्थी त्यांच्या घरूनच परिक्षा देवु शकतात असेही सामंत यांनी सांगितले.

 

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!