Share

बंगालमध्ये भाजपा सरकार आल्यानंतर मच्छिमारांना दरवर्षी 6000 रुपये दिले जाणार- शाह

Published On: 

कोलकाता- दोन दिवसांच्या दौऱ्यावर पश्चिम बंगालमध्ये दाखल झालेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नामखान्यातील सभेत भाषण केले. शहा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्ला केला. ते म्हणाले की, जय श्री रामांचा जयघोष केला तर दीदी बोलतात की त्यांचा अपमान होतो. टीएमसीवर हल्ला चढवत रॅलीत अमित शहा यांनी जय श्री राम यांच्या घोषणा दिल्या.

अमित शाह यांनी या परिवर्तन यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये भाषण देताना आम्हाला सोनार बंगला घडवण्यासाठी राज्यात सत्ता हवी आहे असं म्हटलं आहे. आगामी विधानसभा निवडणूक ही आमचे बूथ कार्यकर्ते आणि तृणमूल काँग्रेसमधील लागेबांधे असणाऱ्यांमध्ये होणार आहे, असंही शाह यांनी म्हटलं आहे.

बंगाल भेटीदरम्यान अमित शहा म्हणाले की आमचे ध्येय सत्ता बदलणे नव्हे तर गरीब लोकांची स्थिती सुधारणे हे आहे. बंगालच्या माता-भगिनींच्या परिस्थितीत बदल करण्यासाठीच आम्ही ही परिवर्तन यात्रा काढली आहे.

शाह म्हणाले की, शेतकऱ्यांना जसा सन्मान निधी मिळतो तसा भाजपा सरकार आल्यानंतर मच्छिमारांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातील. बंगालच्या नामखाना येथे सभेला संबोधित करताना अमित शहा यांनी ममता बॅनर्जी यांना लक्ष्य केले. शाह म्हणाले की,की बंगालमध्ये दुर्गापूजनासाठी कोर्टाकडून परवानगी आवश्यक आहे. दीदींनी शाळांमध्ये सरस्वती पूजा बंद केली, भाजपाच्या दबावामुळे दीदी सरस्वतीची पूजा करताना दिसतात.

अमित शहा म्हणाले की आम्ही बंगालमधील तुष्टीकरणाचे राजकारण संपवू जेणेकरून लोक सरस्वती पूजा-राम नवमी साजरी करू शकतील. दुर्गापूजा करण्यासाठी कोणाची परवानगी घेण्याची गरज नाही.जर येथे भाजपाचे सरकार बनले तर आमचे सरकार येताच सरकारी  कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्याचे काम केले जाईल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!