Share

शिवसेना सत्तेसाठी लाचार, सावरकरांच्या मुद्यावरही शिवसैनिक निमूटपणे गप्प बसले : फडणवीस

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस सावरकरांच्या मुद्यावरून चांगलाच गाजला. भाजपने राहुल गांधीच्या वक्तव्याचा समाचार घेत त्यांनी माफी मागावी अशी मागणी लावून धरली. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवरही हल्ला केला. सत्तेसाठी शिवसेनेने लाचारी पत्करली आहे, असा घणाघातही देवेंद्र फडणवीस यांनी केला.

अधिवेशनाचा पहिला दिवस संपताचं देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ब्रिटीश पार्लमेंटमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचया नावाला बंदी आहे. तशीच बंदी आपल्या विधानसभेतही आहे का ? जर महाराष्ट्राच्या विधानसभेत सावरकरांविषयी बोलायचं नाही तर मग कोठे बोलयचं ? असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

तसेच मी जेव्हा सावरकरांच्या गौरवात बोलायला लागलो. तेव्हा सभापतींनी त्याला पटलावरून काढून टाकायला लावले. हे चुकीचे आहे. आणि हा सारा प्रकार शिवसेना नेते निमूटपणे पाहत होते. यावरून दिसून येते की, शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली आहे. असे असले तरी आम्हाला सावरकरांविषयी बोलताना कोणी रोखू शकत नाही. तसा प्रयत्न झालाचं तर आम्ही सहन करणार नाही. हक्क भंगाची कारवाई झाली तरी चालेलं पण आम्ही बोलणारचं , असे फडणवीस यांनी ठामपणे सांगितले.

दरम्यान राहुल गांधी यांच्या मी सावरकर नाही, राहुल गांधी आहे, या वक्तव्यावरून भाजप चांगलीचं आक्रमक झाली आहे. राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी भाजप नेते आणि सावरकर समर्थक करत आहेत. दिल्लीतील रामलीला मैदानावरील भारत बचाव रॅलीत बोलताना राहुल गांधी यांनी सावरकरांचे नाव घेत खळबळजनक वक्तव्य केले. त्यामुळे आता याचा निषेध भाजप नेते करताना दिसत आहेत.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1206472435555373056?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1206467656863272960?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1206462059489030145?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!