मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसापासून गारपीटसह अवकाळी पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’मुळे सध्या विदर्भात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हवामान विभागाने रविवारपासून वादळी पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण, पाऊस सुरुच आहे. यामुळे, रब्बी पिके आणि भाजीपाल्याला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे नागपूर, चंद्रपूर सह गोंदिया या भागात अवकाळी पाऊस पडला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी अशी मागणी भाजप नेते आशिष शेलार (BJP leader Ashish Shelar) यांनी केली आहे.
‘राज्यात गेले काही दिवस सतत होत असलेल्या गारपीट आणि अवकाळीने सुमारे 2 लाख हेक्टरपेक्षा जास्त पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. मराठवाडा, विदर्भातील शेतकरी पुर्ण उध्वस्त झाला आहे. त्यामुळे बिल्डर, पब,बारवाले, दारुवाले यांना ज्या तडफेने मदत वाटलीत तशीच सरसकट मदत आता शेतकऱ्यांना करा! अशी मागणी आशिष शेलार यांनी ट्वीट करत केली आहे.
राज्यात गेले काही दिवस सतत होत असलेल्या गारपीट आणि अवकाळीने सुमारे 2 लाख हेक्टरपेक्षा जास्त पिकाचे अतोनात नुकसान झालेय. मराठवाडा, विदर्भातील शेतकरी पुर्ण उध्वस्त झालाय..
त्यामुळे बिल्डर, पब,बारवाले, दारुवाले यांना ज्या तडफेने मदत वाटलीत तशीच सरसकट मदत आता शेतकऱ्यांना करा!
2/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 12, 2022
तसेच बिल्डरांना प्रिमियममध्ये ११ हजार कोटींच्या सुटीची खैरात केलीत बार,पब,रेस्टॉरंटना लायसन्स फी मध्ये कोट्यावधीची सवलत दिलीत. विदेशी दारुला करात ५०% सुट आणि वायनरींना सवलतींची खिरापत वाटलीत. तेव्हा कुठे नुकसानीचे पंचनामे केले होते..? मग आता शेतकऱ्यांचे कसले पंचनामे करताय? शेतकऱ्यांना सरसकट आणि तात्काळ मदत करा,अशी मागणी करत आशिष शेलार यांनी बार,पबवरून ठाकरे सरकारवर निशाणा साधत टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- “…तर तुमचा मेंदू कुठे आहे तेवढा तपासून पाहा”, पवारांवर केलेल्या टीकेवर आव्हाडांचे प्रत्युत्तर
- रेल्वे सुरक्षा दलात भरतीची ‘ती’ प्रसिद्ध झालेली जाहिरात बोगस?; रेल्वे प्रशासनाने दिली माहिती
- युपीत भाजपला मोठा धक्का; ‘या’ मंत्र्याने केला सपामध्ये प्रवेश
- ‘आता पर्यंत आम्ही तुम्हा खूप…’; न्यायालयाचा परमबीरसिंग यांना दणका
- “पवार साहेबांची अॅलर्जी कोणाला असण्याचे कारण नाही”, पडळकरांना छगन भुजबळांचे प्रत्युत्तर


