Share

वैजापूरात धुव्वाधार पाऊस; शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : वैजापूर शहरासह तालुक्यात अतिवृष्टीच्या पावसाने थैमान घातले असून हाहाकार उडाला आहे. तालुक्यात दोन ठिकाणी विज कोसळली ग्रामीण भागातील अनेक गावांत पाणी शिरले. रस्ते बंद झाल्याने संपर्क तुटला. मात्र या धुव्वाधार पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

सोमवारी रात्री अतिवृष्टी व ढग फुटीच्या जोरदार पावसाने वैजापूर शहराला झोडपले. तसेच गंगाथडी भागात ढगफुटी जन्य जोरदार पाऊस झाल्याने बहुतांश गावातील नागरिकांचा संपर्क तुटला. ओढे, नाले ओसंडून वाहू लागले. तालुक्यातील विरगांव लाडगाव, विजरगांव, कापूसवाडगांव, हनुमंतगांव म्हस्की वाड्यातील नागरिकांचा संपर्क तुटला होता. विरगांव येथील नदीला पूर आल्याने शिरगांव गावात घरात पाणी शिरले. तसेच तालुक्यातील लाडगांव येथे गावातील अमोल दत्तू निकम यांच्या घरावर विज कोसळल्याने घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणासह अनेक संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले.

अनेक ठिकाणी घरालाही तडे गेले. तसेच गावातील शाळेत पाणी शिरले. वैजापूर, श्रीरामपूर मार्गावर सावखेडगाव लाडगांव रोडवरील पाणी आल्याने सकाळी दोन ते तीन तास वाहतूक ठप्प झाली होती. तसेच तालुक्यातील धोंदलगांव येथील शेत गट नंबर ११९ मध्ये शेतकरी कचरु गंगाधर आवारे यांच्या शेतवस्तीवर सकाळी वीज पडून एक बैल जागेवर ठार झाला आहे. तसेच शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!