Share

राज्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज, तर खडकवासला, कोयनासह राज्यातील अनेक धरणातून विसर्ग वाढवला

Published On: 

मुंबई : येत्या २४ तासांत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यभरात कोरोनाचे सावट असल्याने यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला जाणार असून गणरायाच्या स्वागताला वरुणराजा जोरदार हजेरी लावणार असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. आज सकाळीपासुनच राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढल्याचे दिसून येत आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणारे बहुतांश तलाव भरले असून विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, पुणे अशा सर्वच ठिकाणचे धरणं जवळजवळ भरले आहेत त्यामुळे पूर परिस्थिती पुन्हा निर्माण होत आहे. गडचिरोलीतील भामरागडमधील पूरस्थिती आणखी बिकट होत असून छत्तीसगडला देखील त्यामुळे पुराचा फटका बसत आहे.

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसाठी शरद पवारांचे वेळापत्रक, ‘या’ वेळेत पक्षाच्या कार्यलयात उपस्थित रहावच लागणार

आज सकाळीपासून खडकवासला धरणातून मुठा नदीमध्ये तब्बल १६ हजार २४७ क्युसेक वेगापर्यंत वाढवण्यात आला आहे. याबद्दल पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली आहे. “खडकवासला साखळी धरण प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रांत पावसाचा जोर वाढल्याने मुठा पात्रातील विसर्ग १६ हजार २४७ क्युसेकपर्यंत वाढवला असून यामुळे बाबा भिडे पूल आणि नदी पात्रातील रस्ते पाण्याखाली जाणार आहे ,” असे ट्विट त्यांनी केले असून नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन देखील केले आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची तयारी सुरू

तर, कोयना धरणातील सहा वक्री दरवाजातून बंद करण्यात आलेला विसर्ग पुन्हा वाढवण्यात येत आहे. कोयना धरणातून १० हजार क्युसेक वेगाने कोयना नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. दरम्यान, पंचगंगा नदीची पाणी पातळी इशारापातळी खाली असली तरी काल रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजा पुन्हा उघडले असून ४ हजार २५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीमध्ये करण्यात येत आहे. त्यामुळे, पावसाचा जोर वाढल्यास पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये पुन्हा वाढ होऊन पुराचे संकट निर्माण होऊ शकते.

देशाच्या जडणघडणीत राजीव गांधींचे अमुल्य योगदान- निलम गो-हे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!