नाशिक : परतीच्या पावसानंतर अवकाळी पावसाचा नाशिक जिल्ह्यात कहर कायम आहे. काल रात्री जिल्ह्याला मुसळधार पावसान झोडपून काढल. पाण्याच्या टंचाई साठी कुप्रसिद्घ असलेल्या मनमाड मध्ये काल रात्री पांझन नदीला पूर येऊन पाणी शहरात शिरल्याने नागरिकांची धावपळ उडाली. त्यामुळे साडे तीनशे कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आल.
शहरात शिरलेल्या पाण्यात अनेक वाहन आणि पाण्याच्या टाक्या वाहून गेल्या. लासलगाव परिसरात देखील मध्यरात्री मुसळधार पावसामुळे नागरिकांचे हाल झाले. तिथली शिवनदी आणि बंधारे भरून वाहिले. नाशिक शहरात रामकुंड परिसरात मर्यादित भागात देखील पाण्याची पातळी वाढली आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम हे आज पुणे, पुरंदर, बारामती, इंदापूर तालुक्याचा दौरा करणार आहेत. झेंडेवाडी, काळेवाडी, सोनारी, आंबोडी, बेलसर, सुपा, कान्हेरी, काटेवाडी, बारामती, बोरी, इंदापूर इथ ते पहाणी करतील.
मिरज रेल्वे स्थानक परिसरात मालगाडीचे पाच डबे रुळावरुन घसरले. मात्र क्रेनच्या साह्याने तीन तासांच्या प्रयत्नानंतर हे डबे पुन्हा रुळावर आणण्यात आले.प्रवासी गाड्या जाणाऱ्या मुख्य रेल्वे मार्गापासून दुसऱ्या गोदामा पर्यंतच्या रेल्वे ट्रॅकवर ही दुर्घटना घडली. याठिकाणी देशभरातून धान्य, सिमेंट, खाद्यतेल आणि इतर वस्तूंची ने -आण केली जाते.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1190530743841083394?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1190526671465566208?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

