टीम महाराष्ट्र देशा : राज्याच्या अनेक भागात कालही पाऊस झाला. कुठे मुसळधार तर कुठे मध्यम स्वरूपाच्या पावसानं हजेरी लावली. अमरावती जिल्ह्यात शनिवारी झालेल्या अवकाळी पावसाने कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा शेतमाल भिजला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाच्या संततधारेनं प्रत्येक तालुक्यात किमान 10 ते कमाल 48 मिलिमीटर पावसाची नोंद कालपर्यंत झाली आहे. सातारा जिल्ह्यात काल सर्वत्र मुसळधार पावसाचा जोर कायम होता त्यामुळं जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले होतं. तर सततच्या पावसानं नदी पाणी पातळी वाढत आहे.
रायगड जिल्ह्यात कालही पावसाची संततधार सुरूच होती. परतीच्या या पावसामुळे भातपिकाचं मोठं नुकसान झालं आहे. लातूर जिल्ह्यातही गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे मांज़रा धरणातील पाणी साठ्यात वाढ होऊन तो 7 दशलक्ष घनमीटर इतका झाला आहे. तर जिल्ह्यातील पन्नास टक्के बंधारे भरले आहेत. शहराला उपयोगी पडणाऱ्या नागझरीचे बंधाऱ्यामध्ये पन्नास टक्के साठा झाल्यामुळे लातूरकरांसाठीचा टँकरचा फेरा लांबणीवर पडला आहे. उस्मानाबाद इथं रात्रभर पाउस पडला, तो अजूनही सुरुच आहे.
पुणे शहर आणि जिल्ह्यातही परवा सकाळपासून पावसाची रिमझिम अजूनही सुरु आहे.राज्याच्या विविध भागांमध्ये या आठवड्यात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस येण्याचा अंदाज हवामान विभागानं यापूर्वीच दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1186173932111425536?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1186170197733863424?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

