Share

तिकीट कापण्याच्या भीतीने खा. धोत्रेंना हृदयविकाराचा झटका ?

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूक २०१९ साठी भारतीय जनता पार्टीची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वीच भाजपचे खासदार संजय धोत्रे यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. अशी चर्चा होती की तिकीट कापलं जाण्याच्या शक्यतेने धोत्रे यांनी धसका घेतला होता. हे वृत्त प्रसारित होताच आता धोत्रे यांनीचं याबद्दल खुलासा केला आहे.

“माझी प्रकृती चांगली आहे. मानदुखीच्या त्रासामुळे नियमित तपासणीसाठी रुग्णालयात आलो होतो. हृदयविकाराच्या बातम्या चुकीच्या आहेत,” असं स्पष्टीकरण खुद्द अकोल्यातील भाजपचे खासदार संजय धोत्रे यांनी दिलं आहे. संजय धोत्रे यांना हृदयविकाराचा झटका आला असून त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचं वृत्त पसरलं होतं. मात्र आता स्वत: धोत्रे यांनी आपण ठणठणीत असल्याचं स्पष्ट केलं.

दैनिक सामनाने दिलेल्या वृत्तानुसार,भाजप यंदा अकोला मतदारसंघातून नव्या चेहऱ्याला उमेदवारी देण्याची शक्यता आहे. भाजपने महाराष्ट्रातील उमेदवारांची अद्याप नावे जाहीर केली नाहीत. नावे जाहीर होत नसल्याने आपल्याला उमेदवारी मिळणार की नाही या चिंतेनेचं गेली काही दिवस ग्रासले होते असं या बातमीत म्हटले आहे.

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!