Share

मराठा आरक्षणाची सुनावणी १४ ऐवजी ७ ऑगस्टला

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : मराठा आरक्षणाची सुनावणी १४ ऐवजी ७ ऑगस्टला घेण्याचा हायकोर्टाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील तीव्र आंदोलन, आत्महत्या यांची हायकोर्टाकडून दखल घेतली असून याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्या विनंतीनंतर न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने हा निर्णय घेतला आहे.

७ ऑगस्टपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा … सकल मराठा मोर्चाकडून सरकारला अल्टिमेटम

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात मोठा पेच प्रसंग निर्माण झाला आहे आह साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका स्पष्ट केली. मी काही नेता नाही, मला कोणतीही प्रसिद्धीच्या नको. मराठा समाजाच्या परिषदांना न्याय मिळण्यासाठी मराठा आरक्षण परिषदेचे आयोजन करणार असल्याची माहिती खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पुण्यात दिली. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मराठा आरक्षण विषयावर विचार मांडले. तत्पूर्वी त्यांनी मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष एम. जी. गायकवाड यांची भेट घेतली.

मराठा आरक्षण : कायमस्वरुपी टिकणारं आरक्षण आम्हीच देणार

मराठ्यांचे 58 मूक मोर्चे निघाले, जगभरातील मीडियाने दखल घेतली, मराठा आरक्षणाचा प्रश्न त्यावेळीच हाताळला असता तर आजची परिस्थिती उद्भवली नसती. दुसऱ्या समाजाचं आरक्षण काढून आम्हाला आरक्षण द्या, असं म्हणत नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलं.

पवारांनी माझ्या कॉलरचे अनुकरण केले. हे बास झाले. अजून काय पाहिजे ? : उदयनराजे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!