टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेच्या जाहीरनाम्यातील असलेले एक रूपयात संपूर्ण आरोग्य चाचणीची अंमलबजावणी मी लागू करणार आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यमंत्री आणि खातेवाटप झाल्यावर राजेश टोपे घनसावंगीत असल्यावर ते बोलत होते.
राजेश टोपे म्हणाले, “आरोग्य खात्यांला आपण न्याय देणार असल्याचा संकल्प केला. शिवसेनेच्या जाहीर नाम्यातील दहा रूपयात थाळी जेवण ही म्हत्वूपर्ण योजना राज्यात प्रायोगीक तत्वांवर सुरू झाली आहे. त्यासह दुसरी एक रूपयात आरोग्य चाचणी ही योजनेची अंमलबजावणी करण्याचा आपला मानस आहे.
राज्यात आरोग्य विभागाला नवी दिशा देण्याचे काम आम्ही करू सामान्य माणसाला हे सरकार आपले वाटले पाहिजेत यासाठी प्रशासनीक पातळीवर वैधकीय अधिकार्यांच्या जागा रिक्त आहे, औषधीपुरवठा नाही याकडे लक्ष दिले जाईल, वैधकीय अधिकार्यांसह रिक्त जागा भरून काढून चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी हे सरकार कटीबध्द राहील असेही टोपे म्हणाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

