Share

राज्यातील आरोग्य सेवाच ‘व्हेंटिलेटरवर’ ; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्रुटींची पोलखोल

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : देशात आणि राज्यात कोरोनाच जे संकट उभं राहिलं आहे त्याने सर्वांच लक्ष आता एकाएकी देशातील आणि राज्यांमंधील आरोग्य पायाभूत सुविधांमधील त्रुटींवर गेलं आहे. या त्रुटी काही महिन्यांतील किंवा १-२ वर्षातील नाही तर गेल्या दोन ते अडीच दशकापासून आरोग्य व्यावस्थेकडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम आहे. जिथे विकसित देश आपल्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ५ % पर्यंत तरतूद ही आरोग्य सेवांसाठी राखुन ठेवतात तिथे आपण जेमतेम १ – १.४ % पर्यंत खर्च करत आहोत.

महाराष्ट्र राज्यात आजघडीला ऍलोपॅथिक, होमिओपॅथिक, आयुर्वेदिक आणि युनानी डॉक्टरांची एकूण संख्या २८४४०० इतकी आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार एक हजार लोकांमागे एक डॉक्टर असे सूत्र आहे. मात्र महाराष्ट्रात तब्बल साडेचार हजार लोकांमागे एक डॉक्टर, असे चित्र असल्याचे समोर आल आहे.

महाराष्ट्र राज्यात आजघडीला २३ जिल्हा आणि ९१  उपजिल्हा रुग्णालये आहेत. तसेच १८२८ प्राथमिक आरोग्य केंद्रे असून १०६६८ उपकेंद्रे आहेत. कोरोनासारख्या जागतिक संकटाचा सामना करण्यासाठी सरकारची आरोग्य यंत्रणा सक्षम असणे गरजेचे आहे. परंतु सरकारकडून कोट्यवधी रुपये खर्चून सरकारी दवाखान्यांच्या इमारती तयार असूनही सेवा देण्यासाठी डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांची भरती होऊ शकलेली नाही.

तसेच कोरोनाच्या भितीने बऱ्याचश्या डॉक्टरांनी आपली खासगी रुग्णालये बंद ठेवली आहेत यामुळे सरकारी रुग्णालयांवरील ताण अधिकच वाढू लागला आहे. सरकारी आरोग्य विभागांत डॉक्टरांच्या रिक्त पदांमुळे कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी आता सरकारकडून सेवानिवृत्त डॉक्टरांचा शोध सुरु झाला आहे.

आजघडीला राज्यातील ४५ कामगारांची नोंदणी असलेल्या १५ विमा रुग्णालयांसाठी ३६६ डॉक्टरांची पदे मंजूर आहेत. तर स्पेशालिस्ट डॉक्टरांची १३५ आणि निवासी स्पेशालिस्ट डॉक्टरांची २९ पदे मंजूर आहेत. या रुग्णालयांमध्ये २६८२ कर्मचाऱ्यांची पदे मंजूर असून खाटांची संख्या २२८० इतकी आहे. मात्र, स्पेशालिस्ट डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असतानाही कोरोनाच्या मुकाबल्यासाठी विमा रुग्णालयांमध्ये विशेष कक्ष उघडण्यात आले आहेत.

मनुष्य बळाच्या तुटवड्या बरोबरच वैद्यकीय उपकारनांचीही राज्यात कमतरता आहे. कोरोनामध्ये मुख्यत्वे करून रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होतो त्यामुळे अश्यावेळी व्हेंटिलेटरची गरज भासते. परंतु देशात अवघे ४००००-५००००  व्हेंटिलेटर आहेत. त्यामुळे एकूणच आरोग्य सुवेधेची परिस्थिती भयावह आहे असेच म्हणावे लागेल.

मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांकडून खाजगी डॉक्टर्सनी दवाखाने बंद करू नये असं आवाहन केलं गेलं आहे तसेच सरकारने खासगी रुग्णालयांवर कारवाईचा बडगा उगारणार असल्याचीशी माहिती दिली आहे. आता कोरोनासारख्या मोठ्या जागतिक आपत्तीतून धडा घेवून राज्य सरकार तसेच केंद्र सरकार आपली आरोग्य यंत्रणा सक्षम करेल अशीच सुज्ञ नागरिकांना अपेक्षा आहे.

महारष्ट्र राज्याची आरोग्य सेवा:

राज्याची लोकसंख्या – १२,६६,३१,४३४

डॉक्टरांची एकूण संख्या – २,८४,४००

अंदाजित खासगी दवाखाने –  ३२,२००

जिल्हा, उपजिल्हा रुग्णालये – ११४

प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे – १२,४९६

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!