Share

‘स्वदेस तो लौट गये लेकिन…’, मायदेशी परतल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूपुढे ‘ही’ अडचण

Published On: 

मुंबई : देशभरात कोरोनाचा कहर वाढत असताना आयपीएल १४ चे पर्व सुरु होते. मात्र आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यांनतर बीसीसीआयने आयपीएल स्थगितीचा निर्णय घेतला त्यानंतर भारतात आयपीएल साठी आलेले खेळाडू आपल्या मायदेशी परतले. आयपीएलच्या 14 व्या मोसमात खेळलेले सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मालदीवमध्ये राहावे लागले. कोरोना संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियाने 15 मे पर्यंत भारताकडून येणाऱ्या उड्डाणावर बंदी घातली होती. ऑस्ट्रेलियन सरकारच्या या निर्णयामुळे खेळाडूंना मालदीवमध्ये राहावे लागले.

उड्डाण बंदीमुळे आयपीएलचा भाग असलेले डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, आणि मायकेल स्लेटर यांनी मालदीवमध्ये वेळ घालवला. हे सर्वजण येथूनच ऑस्ट्रेलियाला रवाना होतील. आयपीएलचा भाग असणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा 35 सदस्यीय संघ लवकरच मायदेशी रवाना होत आहे.

मालदीवमध्ये 14 दिवस क्वारंटाइन राहिल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आज आपल्या देशात परतणार आहे. ऑस्ट्रेलियाचे सर्व खेळाडू आज आपल्या देशात पोहोचणार खरे मात्र त्यांना थेट घरी जाता येणार नाही. त्यांना हॉटेलमध्ये 10 दिवस क्वारंटाइन राहावं लागणार आहे. त्यानंतर खेळाडू आपल्या घरी जाऊ शकणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!