मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. सामान्यांपासून ते सेलिब्रेटीपर्यंत अनेकजनाना या कोरोनाचा सामना करावा लागत आहे. त्यातच प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या पतीला कोरोनाची लागण झाली होती.
दरम्यान, शिल्पा शेट्टीने नुकतंच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे आणि तिच्या पतीचे काही फोटोज शेअर केले आहेत. या फोटोमध्ये शिल्पा पती राज कुंद्रासोबत रोमान्स करताना दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच राज कुंद्राचे रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह झाले आहेत. पती राज कुंद्रासोबतचे फोटोज शेअर करताना शिल्पा शेट्टीने काही हॅशटॅग देखील वापरले आहेत. पती राज कुंद्राचा क्वारंटाइन पिरियड देखील संपला असल्याचं यात शिल्पा शेट्टीने सांगितलं आहे.
https://www.instagram.com/p/CO7MvxmBCHk/?utm_source=ig_web_copy_link
शिल्पा शेट्टीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये दोघे जण रोमान्स करताना दिसत आहेत. या फोटोला तिने एक कॅप्शन देखील दिले आहे. यात तिने लिहिलंय, “करोना काळातलं प्रेम”. शिल्पा शेट्टीने पुढे लिहिलं, ‘करोना प्यार है…तुम्हा सर्वांच्या शुभकामना, चिंता आणि प्रार्थनेसाठी खूप खूप आभार…’
महत्वाच्या बातम्या
- ‘मी डब्ल्यूटीसीसाठी कसून सराव करत आहे’ ; हनुमा विहारी टीम इंडियात पुनरागमनासाठी सज्ज
- ‘त्याला मंगळावरही खेळवले तरी तो तसाच खेळेल’ डिव्हीलियर्सवर आकाश चोप्राची स्तुतीसुमने
- इंग्लंड दौऱ्यापूर्वी ‘टीम इंडिया’ची डोकेदुखी वाढली ; ‘हे’ मुख्य खेळाडू अजूनही अनफिट
- चेन्नईचा प्रशिक्षक मायकल हसीची पुन्हा एकदा कोरोनावर मात, मायदेशी रवाना
- ‘सिटीमार’ गाण्यावर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा जबरदस्त डान्स ; व्हिडिओ पाहून दिशाने पण दिली कमेंट

