Share

शरद पवार यांना काँग्रेसचे अध्यक्ष करावे – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

Published On: 

मुंबई  – काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास सध्या राहुल गांधी तयार नाहीत. सोनिया गांधीही अध्यक्षपद सांभाळण्यास तयार नाहीत.काँग्रेसला अजून अध्यक्ष सापडत नाही. त्यामुळे माझी काँग्रेसला सूचना आहे की त्यांनी मूळ काँग्रेस चे असणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना काँग्रेस चे अध्यक्ष करावे.शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेस मध्ये विलीन करून काँग्रेसचे अध्यक्षपद शरद पवार यांना बहाल करावे. माझ्या या सुचनेबाबतचा निर्णय सर्वस्वी काँग्रेस आणि शरद पवार यांनी घ्यावा.असे आवाहन आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी काँग्रेसला केले.

स्व.अनिल राठोड यांच्या कुटुंबामागे शिवसेना खंबीरपणे उभी-दादा भुसे

 

काँग्रेस जा देशातील मोठा आणि जुना पक्ष आहे.मात्र या पक्षाला सध्या सक्षम द्रष्टे नेतृत्व नसल्यामुळे काँग्रेस चे पानिपत झाले आहे. कधी काळी 400 पेक्षा जास्त खासदार निवडून आणणारा काँग्रेस पक्ष आता 100 खासदार ही निवडून आणू शकत नाही. दलित बहुजनांचा विश्वास तुटल्यामुळे काँग्रेसची अवस्था वाईट आहे. त्यामुळे काँग्रेस चे अध्यक्ष पद सांभाळण्यास कुणी पुढे येत नाही. राहुल गांधी ही काँग्रेस चे अध्यक्ष पद स्वीकारण्यास तयार नाहीत त्यामुळे काँग्रेस ला नवी उभारी देण्यासाठी मूळ काँग्रेस चे ज्येष्ठ नेते असणारे शरद पवार यांना काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष पद सोपवावे अशी माझी सूचना असून त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस चे काँग्रेस मध्ये विसर्जन करावे असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले आहे.

विदर्भातील शेतकऱ्यांना जगवा, ‘या’ भाजप आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!