Share

कोव्हिड-१९च्या काळात कामाचे वाटप न झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय –  नीलम   गोऱ्हे

Published On: 

पुणे :  कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री ना. श्री प्रकाश जावडेकर आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची बैठक आयोजित केली. यावेळी उपमुख्यमंत्री तथा पुणे पालकमंत्री अजितदादा पवार, कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री दत्ता भरणे उपस्थित होते. याबैठकीत शिवसेना प्रवक्त्या आ.डॉ.नीलम गोऱ्हे ह्या व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उपस्थित झाल्या होत्या. यात त्यांनी पुढील मुद्द्यांना हात घातला. यात मनपा मध्ये गेली नऊ वर्ष मुख्य आरोग्य अधिकारी हे पद शासनाने भरलेला नाही. कोविडच्या पार्श्वभूमीवरती असे महत्त्वाचे पद रिक्त ठेवणे योग्य नाही आता हे पद भरले गेले आहे तरी आरोग्य अधिकारी यांच्या कडक कार्यवाही करण्याची सूचना आ.डॉ.गोऱ्हे यांनी केली.

कोविड हॉस्पिटल उभे करतांना पीएमआरडीए, पीएमसी आणि राज्य आरोग्य विभाग त्यांनी एकत्रित येऊन एक सामंजस्य करार करून हॉस्पिटल उभे करणे गरजेचे होते. तसेच कोविडच्या अनुषंगाने आपल्या जबाबदाऱ्या या तीनही ही विभागणी योग्य प्रकारे वाटप करून घेणे गरजेचे आहे. या ठिकाणी कामाचे वाटप व्यवस्था न झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याची खंत आ.डॉ.गोऱ्हे यांनी व्यक्त केली. पीएमआरडीए विभागाने आठ वर्षांमध्ये लोकप्रतिनिधींच्या सोबत कधीही बैठक घेतलेली नाही किंवा विकासाच्या कामासंदर्भात कधीही कोणतीही माहिती सांगितलेली नाही हे मुद्दे देखील आ.डॉ.गोऱ्हे यांनी मांडले.

जिल्हा परिषद पुणे यांनी ग्रामीण भागामध्ये ज्यां नागरिकांकडे रेशन कार्ड नाही त्यांच्यासाठी अन्नधान्य उपलब्ध करुन दिले आहे. तशी व्यवस्था शहरी भागासाठी स्वतंत्र योजना करण्यात यावी.  खाजगी हॉस्पिटलच्या भेटीसाठी महापौरांनी कार्यक्रम तयार करावा. या भेटीच्या कार्यक्रमात आमदार व खासदार यांना ही सहभागी करून घ्यावे. खाजगी हॉस्पिटल भेटीवेळी व्हिडीओ चित्रीकरण करण्यात यावे. यामुळे लोकांच्या मनामध्ये असणारा गैरसमज अफवा निघून जाईल व वस्तुस्थिती काय आहे हे स्पष्ट होईल अशा विविध सूचना आ.डॉ.गोऱ्हे यांनी सदरील बैठकीत मांडले. याला उपमुख्यमंत्री तथा पुणे पालकमंत्री यांनी उत्तम प्रतिसाद दिला असून दिलेल्या सूचनांवर कार्यवाही करण्याची सूचना प्रशासनास दिली.

मास्क शिवाय फिरणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करा – शरद पवार

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!