Share

१८ जूनला HDFC बँक मोठ्या घोषणा करण्याची शक्यता

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: देशातील सर्वात मोठी खासगी बँक असणाऱ्या एचडीएफसी बँकेत मोठे धोरणात्मक बदल होणार आहेत. याचा प्रभाव HDFC बँकेचे ग्राहक आणि संबंधित गोष्टींवर पडणार आहे. या नव्या बदलांमुळे एचडीएफसी बँकेची स्थिती सुधारण्याबरोबरच ग्राहकांनाही नवे फायदे मिळणार असल्याचे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  शशी जगदीशन यांनी केले होते. त्यानुसार HDFC बँकेच्या संचालक मंडळाची १८ जूनला महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत अनेक मोठ्या घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

एखाद्या कंपनीला खूप नफा झाल्यास त्याचा फायदा डिव्हिडंटच्या स्वरुपात समभागधारकांना दिला जातो. समभागधारकांना डिव्हिडंट देणे अनिवार्य नसते. हा निर्णय सर्वस्वी कंपनीच्या संचालक मंडळावर अवलंबून असतो. त्यामुळे आता HDFC बँकेच्या समभागधारकांना याचा फायदा होणार कि नाही याकडे अनेकांचे लक्ष असणार आहे.

क्रेडिट कार्डांमध्ये मोठे बदल

बँकेची धोरणे आणि रचनात्मक बदलांसह क्रेडिट कार्डांमध्येही मोठे बदल होणार आहेत. नव्या तंत्रज्ञानाला अनुकूल अशी क्रेडिट कार्ड ग्राहकांना देण्याचा विचार एचडीएफसी बँक करत आहे. त्यासाठी क्रेडिट कार्ड विभागाचा कारभार फिनटेक या कंपनीकडे सोपवला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे क्रेडिट कार्डाच्या एन्ड टू एन्ड सुरक्षेत वाढ होणार आहे.

बँकेतील नव्या बदलांचे फायदे ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. नव्या रचनेमुळे कोणत्याही निर्णयाची अंमलबजावणी वेगाने होणार असून ज्याचा फायदा देशभरातील बँकेच्या ग्राहकांना मिळेल, असा विश्वास शशी जगदीशन यांनी व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!