🕒 1 min read
औरंगाबाद : संघर्ष समितीच्या मागण्या पूर्ण न करत गुरुवारी(ता.17)अखेर धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कन्नड जवळील हतनूर येथील बहुचर्चित टोल सुरू झाला. या टोलवर टोल परिसरातील 20 किलोमीटर अंतरा आतील रहिवासी प्रवाशांना 275 मासिक टोल पास मिळणार आहे. दरम्यान, महामार्गावरील सर्व त्रुटी दूर करण्याचे आश्वासन महामार्ग प्राधिकरणाचे व्यवस्थापक तथा प्रकल्प अधिकारी अरविंद काळे यांनी दिले आहे.
डॉ.आण्णा शिंदे,डॉ.सदाशिव पाटील,अशोक दापके सह महामार्ग संघर्ष समितीने यावर उपाय सुचविल्यानुसार बोरगाव हुन देवगाव व टाकळी व अंधानेर हुन कन्नड येण्यासाठी दोन ठिकाणी भुयारी मार्ग आवश्यक आहे. नाशिक -पुणे हा महामार्ग आपल्या धुळे सोलापूर महामार्गाच्या समकालीन महामार्ग आहे.
त्या महामार्गाच्या संगमनेर जवळील टोल वर स्थानिकांना केवळ आधार कार्ड दाखवल्यावर टोल वरून पुढे जाऊ दिले जाते. त्याप्रमाणे धुळे सोलापूर महामार्गावर स्थानिकांना मासिक टोल रद्द करून केवळ आधार कार्ड दाखवून टोल वरून जाऊ द्यावे,तसेच अंधानेर ब बोरगाव येथे भुयारी मार्ग होई पर्यंत गतिरोधक करण्यात यावे अशी संघर्ष समितीची भूमिका आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सर्व राष्ट्रासाठी एकच कार्यालय असून सर्वीकडे नियम सारखा असणे अपेक्षित आहे.मात्र इकडे स्थानिकांना प्रत्येक महिन्याला 275 रुपयांचा खर्च करावा लागत आहे.हा कन्नड कारांवर अन्याय आहे.पश्चिम महाराष्ट्रातील नेते सक्षम आहेत म्हणून तेथे स्थानिकांना टोल नाही व इकडे स्थानिकांना टोल भरावा लागतो हा अन्याय सहन केला जाणार नाही.
टोल प्लाझा पासून 20 किलोमीटर परिघातील नागरिकांना 275 रुपयात मासिक पास मिळणार आहे.पास देण्यासाठी टोल प्लाझावर चार काउंटर लावलेले आहेत.अटीत बसत असलेल्या स्थानिकांनी आपल्या गाडीचे आर.सी.व आधार कार्ड दिल्यावर त्यांना मासिक पास दिला जाईल. अशी माहिती महामार्ग प्राधिकरण व्यवस्थापक तथा प्रकल्प अधिकारी अरविंद काळे यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- मोटू-पतलूच्या हातात कोंबड्या देऊन युवासेनेचे राणेंच्या विरोधात आंदोलन !
- महाजनांना धक्का : भाजपचे तब्बल 27 फुटल्याने जळगाव महापालिकेत शिवसेनेचा भगवा फडकला
- …म्हणून उर्मिला मातोंडकरांनी खास ट्विट करून आदित्य ठाकरेंचं केलं अभिनंदन
- भारताचा गोलंदाजपटू राहुल शर्माच्या वडिलांचे कोरोनोमुळे निधन
- येत्या वर्षभरात हटवण्यात येणार सर्व टोलनाके; नितीन गडकरींची मोठी घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

